वाढवणा ते वाढवणा पाटी रस्त्यावर खड्डेच खड्डे!दुरुस्तीची मागणी
वाढवणा बु (हुकूमत शेख) : उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी व वाढवणा तीन किलोमीटरचा डांबर रस्ता असुन दोन तीन वेळा रस्त्यावर रस्ता वरच्यावर गिट्टी, थोडे डांबर घालुन रोलर फिरवून अंदाज पत्रका प्रमाणे काम न करता गुत्तेदाराने थातूर माथुर काम केल्यामुळे वर्ष सहा महिन्यातच रस्ता खराब झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला तीन किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजवून घेता येत नाही का? असा प्रश्न विचारत सामान्य नागरीक सां. बा. खात्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. खड्डे पडल्यामुळे अनेक जण दुचाकी स्वार रात्री अंधारात खड्ड्यात पडून अपघात झाले आहेत. तसेच गरोदर महिलांना उदगीर रुग्णालयात किंवा हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती साठी जावे लागत असुन मोठं मोठे खड्ड्यामुळे महिलांना नाईलाजास्तव जिव धोक्यात घालुन तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे.
खड्डेच खड्डे झाल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात वाहन पलटी होत आहेत. काही चालक पलटी होण्याची भितीने मेटाकुटीस आले आहेत. काही वाहनांचे रस्त्यावर अदळून आपटून नट बोल्ट पार्ट खराब होत आहेत. पंक्चर होत आहेत, गिट्टी उघडी पडल्यामुळे टायर खराब होत आहेत. पाटे तुटतं असल्याने केलेली कमाई दुरुस्तीत घालुन वाहन मालक, चालक परेशान झाले आहेत. मोटार सायकलवर प्रवास करणाऱ्याला खड्ड्यात चाक आपटून कंबरडे दुखत आहेत. तर काहींच्या मनक्यात ग्याप पडल्याची चर्चा होत आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपीचे सोंग घेउन बघ्याची भूमिका घेत मस्त अरामात आहे.
गरोदर माता व वाहनधारक परेशान झाले आहेत, आता तरी संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधी आजी, माजी आमदारानी जातीने लक्ष घालुन लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागास धारेवर धरून तात्काळ वाढवणा ते वाढवणा पाटी तीन किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजवून होणारी गैरसोय दुर करण्याची मागणी होत आहे.विकासाच्या नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा प्रत्येकशात काम केले जावे,अशी मागणी जोर धरत आहे.
