जळकोट तालुक्याच्या विकासाला गती माजी गृहराज्यमंत्री आ. संजयजी बनसोडे यांच्या मुळेच – चंद्रशेखर पाटील आतनूरकर

जळकोट तालुक्याच्या विकासाला गती माजी गृहराज्यमंत्री आ. संजयजी बनसोडे यांच्या मुळेच - चंद्रशेखर पाटील आतनूरकर

उदगीर (एल.पी.उगीले) : जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो, या तालुक्यात जवळ पास एकूण 47 गावे आहेत. या जळकोट तालुक्याची निर्मिती झाल्यापासून अनेक नेतृत्व तयार झाले, अनेक आमदार ही होऊन गेले. हा तालुका तसातर उदगीर जळकोट मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या जळकोट तालुक्यात सतत दुष्काळ असायचा, त्यामुळे शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्नात तसे कमीच असायचे, त्याच बरोबर दळण वळणाची साधनेही कमीच होती व खेडो पाड्यात गावो गावी रस्तेही चांगली न्हवती. खड्यात रस्ते का रस्त्यात खाच खळगे हेच कळन्यास मार्ग न्हवता. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर जळकोट तालुक्याच्या विकासाकडे कोणत्याही नेत्याने लक्ष दिले नाही. जळकोट तालुक्यातील जनतेचा वापर फक्त मतदाना पुरताच वेळोवेळी करण्यात आला, पण 2019- 20 ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि उदगीर जळकोट मतदारसंघातील सर्व जनतेनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजयजी बनसोडे यांच्या वर विश्वास टाकला, आणि बनसोडे आमदार झाले, व आमदार संजय बनसोडे यांची निष्ठा यांची पक्ष वाढीसाठी असलेले तळमळ, मेहनत पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार, आ. बनसोडे यांना महाराष्ट्राच्या महत्वाच्या आठ खात्याचे राज्यमंत्रीपद बहाल केले, आणि उदगीर जळकोट मतदारसंघाचे भाग्य उजाळले. माजी गृहराज्यमंत्री आ. संजयभाऊ बनसोडे यांनी उदगीर तालुक्याबरोबर जळकोट तालुक्याच्या विकास कामास भरघोस असा निधी मंजूर करून दिला.

जळकोटचा तर विकास केलाच मग ते तहसील साठी नवीन ईमारत असेल किंवा क्रीडा संकुलन असेल व शासकीय विश्रामगृह असेल त्याचबरोबर जळकोट मधील अंतर्गत रस्ते असतील, जळकोटच्या पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक विकासाची कामे माजी गृहराज्यमंत्री आ. संजयजी बनसोडे यांनी केले आहेत.

त्याच बरोबर जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात माजी गृहराज्यमंत्री आ. संजयभाऊ बनसोडे यांनी मूलभूत योजने अंतर्गत 2515 योजने अंतर्गत किंवा स्वतःच्या आमदार निधीच्या माध्यमातून असेल, प्रत्येक गावात सिसिरोड, फेवर ब्लॉकचा रोड, स्मशान भूमी, जिल्हा परिषदच्या शाळेस संरक्षण भिंत स्मशान भूमी संरक्षण भिंत, नवीन नाल्या, जलजीवन अंतर्गत पाईपलाईन अशी अनेक विकासाची कामे माजी गृहराज्यमंत्री आ. संजयभाऊ बनसोडे यांनी केली आहेत. आणि चालू सुद्धा आहेत. तसेच नदीवरील मोठे मोठे पुल असतील, उदाहरणात आतनूर च्या तेरु नदीवर पूल त्याच बरोबर जळकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा एक सतत भेडसावणारा प्रश्न होता, तो म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न. माजी गृहराज्यमंत्री यांनी लक्ष घालून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी मंत्री जयवंतरावजी पाटील यांच्या लक्षात आणून देऊन सतत पाठ पुरावा करून तेरु नदीवरील 7 बॅरेजेसना मंजुरी मिळून घेतली. व त्या कामास सुरुवात ही झाली. या बॅरजेस मुळे जळकोट तालुक्यातील पाणी प्रश्न कायमचाच सुटणार आहे. व ज्या जळकोट तालुक्यात दुष्काळी तालुका म्हणून ओळखले जात होते, ते नाव आता कायमचेच पुसले जाईल. व जळकोट तालुक्यात हरित क्रांती झाल्या शिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने जळकोट तालुक्याच्या विकास कामासाठी माजी गृहराज्यमंत्री आ. संजयभाऊ बनसोडे यांनी 700 कोटी रु निधी मंजूर करून आणलेला आहे, आणि हे आ. संजय बनसोडे यांच्या मुळेच शक्य झाले आहे.

म्हणूनच तळा गाळतील सर्व सामान्य जनता म्हणत असते की, संजय भाऊ बनसोडे यांच्या सारखा आमदार उदगीर जळकोट मतदारसंघास लाभणे म्हणजे मतदार संघाचे भाग्यच!

About The Author

error: Content is protected !!