महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची चळवळ म्हणजे मनसे – संजय राठोड

महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची चळवळ म्हणजे मनसे - संजय राठोड

उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या पंधरा दिवसांमध्ये उदगीर शहर मनसेमध्ये सलग तिसरा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष संतोष भोपळे यांच्या नेतृत्वात अनेक तरुण मनसेमध्ये प्रवेश करत आहेत. संतोष भोपळे यांनी शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळताच त्यांनी युवा तरुणांचा पक्षप्रवेशाचा धडाका लावला असून शहरात मनसेचे मजबूत संघटन तयार करण्यास सुरुवात केली आहे.

याप्रसंगी संजय राठोड बोलताना राज ठाकरे यांनी ” जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याच्या” उदात्त हेतूने मनसेची स्थापना केली असून मनसे म्हणजे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची चळवळ आहे. त्यामुळे सर्व तरुणांनी या चळवळीत सहभागी होऊन महाराष्ट्राच्या नवनिर्माणात आपला सहभाग नोंदवावा, असे मत व्यक्त केले.

उदगीर मध्ये तरुणांनी पक्ष प्रवेश केला. त्यात आनंद मोरे, गजानन बिरादार, सुनील तेलंगे , नामदेव आवळे , महेश लोहकरे , कपिल सूर्यवंशी, बाळू सूर्यवंशी, ईश्वर चिद्रेवार,सचिन कदम, मुकेश कांबळे, किशन वाघमारे , कृष्णा वाघमारे, ऋषी कांबळे यांच्यासह तरुणांनी प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी पक्षाचा झेंडा या तरुणांच्या हाती देऊन त्यांचा अधिकृत पक्ष प्रवेश करून घेतला.

याप्रसंगी शहराध्यक्ष संतोष भोपळे, तालुका उपाध्यक्ष गुरुदत्त घोणसे, मनविसे तालुका अध्यक्ष रामदास तेलंगे, शहर उपाध्यक्ष लखन पुरी, शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष अजय भंडे, सुनील तोंडचिरकर , अविनाश ठाकूर, राजू भोपळे, बिरबल म्हेत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!