विलास सहकारी साखर कारखाना मार्फत कर्मचारी कार्यशाळा व शेतकरी मेळवा!
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील भाकसखेडा येथे विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कर्मचारी कार्यशाळा व शेतकरी मेळवा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक आत्माराम पवार हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून विलास सहकारी साखर कारखाना युनिट-२ चे उपाध्यक्ष रविंद्र काळे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील शास्त्रज्ञ ,उती संवर्धन विभाग डॉ.एस.जी. दळवी व जनसंपर्क अधिकरी कृषी विभाग,आर.बी. भोईटे हे होते. प्रमुख उपस्थिती मुख्य शेतकरी अधिकरी श्रीराम पाटील, ऊस विकास अधिकारी शशीकांत बुलबुले, निमंत्रीत सदस्य अभय हिप्परकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना उपाध्यक्ष रविंद्र काळे यांनी शेतकरी हा आज अंत्यत महत्वाचा असून त्यांनी नविन नविन ऊसाची लागवड केली पाहिजे, ज्यामुळे टनेज वाढेल. तसेच अधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपणही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन उत्पादन वाढविले पाहीजे. लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करताना शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचे आम्हाला शिकवले आहे. त्याप्रमाणे आम्ही माजी पालकमंत्री आ. अमितभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. शेतकरी यांचे हित जोपासण्याचे कामे करत राहू.
यावेळी शास्त्रज्ञ यांनी वसंत ऊर्जा फवारणीचे नियोजन व फायदे तसेच खोडवा ऊसाचे , ऊसातील पाचट यांचे कंपोष्ट खत तयार करण्यासाठी काय करावे? याविषयी माहिती दिली. तसेच कर्मचारी यांनी पहिल्यांदा शेतकरी यांचे बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे व नविन तंत्रज्ञानची माहीती शेतकरी बांधवांना द्यावी. त्याचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा, असे सांगीतीले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाकसखेडा ग्रामस्थ यांच्या वतीने उपाध्यक्ष रविंद्र काळे यांचा सत्कार चेअरमन विवेक जाधव, सुजीत बिरादार व आत्माराम पवार यांचा बालाजी मोरे, अनंतराम जाधव यांनी केला. यावेळी शेतकरी उध्दव विश्वनाथ जाधव, माजी सरपंच प्रकाश जाधव, श्रीहारी जाधव, दयानंद मोरे,भास्कर जाधव, धनाजी मोरे, लिंबाजी खेडकर, महाविर जाधव, माधव जाधव, श्याम जाधव ,जनार्दन जाधव , शिवलींग टेकपुंजे , रामेश्वर मोरे , माधव टेकपुंजे, परमेश्वर मोरे, ज्ञानेश्वर मोरे, गोपाळ जाधव, नृसिंह जाधव, तुकाराम मोरे , शिवाजी पाटील, सर्जेराव तोबरे , नामदेव जाधव, शिवाजी जाधव, विठ्ठल जाधव, गणेश बिरादार, नरेंद्र पाटील, लक्ष्मण तेलंगे, सतिष मोरे, एकनाथ जाधव , एकनाथ मोरे यांच्या सह इतर शेतकरी बांधव होते. कर्मचारी सिध्देश्वर कोरे, दत्तात्रय घडले, सुखानंद रोडगे , महंमद पठाण हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पंडित जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन पठाण केले.
