राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अवैध मद्य विरुध्द धडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अवैध मद्य विरुध्द धडक कारवाई

लातूर (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उप आयुक्ता श्रीमती उषा वर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे अधीक्षक केशव गो. राऊत, राउशु, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८/१२/२०२२ रोजी उदगीर विभागात दोन चार चाकी वामनांमध्ये अवैध दारुची वाहतूक करीत असतांना १०८० लीटर देशी दारुसह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयामध्ये एकूण रु. १४२००००/- रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अवैध दारुचा होणारा वापर रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिलेल्या आदेशान्वये उप-विभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे व अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विभागाने उमेश अशोक होरे यांच्या राहत्या घरी मौ. अंबुलगा, ता. निलंगा येथे रुम उघडून आत प्रवेश करुन आत ठेवलेले ६ बॉक्स देशी दारु जप्त करण्यात आले गणेश वैजनाथअप्पा गोळे सहाय्यक दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उदगीर यांच्या फिर्यादिवरुन आरोपी उमेश अशोक होरे रा. अंबुलगा, ता. निलंगा याच्याविरुध्द कलम ६५ (अ) (ई) महराष्ट्र दारुबंदी अधिनियम सह कलम १८६ IPC अन्वये गुन्हा दाखल करुन एकूण १९३९०/- रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अवैध मद्य विरुध्द धडक कारवाई

तसेच दि. ११/१२/२०२२ रोजी लातूर शहरामध्ये एका चारचाकी वाहामध्ये परराज्यनिर्मित ६९ लिटर विदेशी दारुसह एका इसमास ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयामध्ये एकूण ३५८५६०/- रुपयांचा परराज्यनिर्मित अवैध दारुसह एकूण अवैध मद्येमाल जप्त करण्यात आला.

सदरच्या कारवाईमध्ये अधीक्षक राउशु, लातूर केशव राऊत, निरीक्षक लातूर विभाग आर. एम. बांगर, निरीक्षक उदगीर विभाग आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक – एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, स्वप्नील काळे, ए. बी. जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक- अनंत कारभारी,  गणेश गोले, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्योतीराम पवार, हनमंत मुंडे, संतोष केंद्रे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ शिंदे, पोलीस उप-निरीक्षक धनराज हरणे, पोलीस नाईक शिवाजी जेवळे, बळीराम केंद्रे यांनी सहभाग नोंदविला.

अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे  केशव राऊत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!