पोलिस पाटलांचा २२ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा धडकनार, आंदोलनाशिवाय पर्याय नाही – शेळके पाटिल

पोलिस पाटलांचा २२ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा धडकनार, आंदोलनाशिवाय पर्याय नाही - शेळके पाटिल

उदगीर (एल.पी.उगीले) : राज्यातिल पोलिस पाटलांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षा पासुन प्रलंबित आहेत.या मागण्यासाठी स्थानिक प्रशासन ते मत्रालय, यांना अनेक वेळा निवेदने देण्यात आली.मात्र सरकारने पोलिस पाटलांच्या मागण्याचा गंभिरतेने कधिच विचार केला नाही.या साठी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटिल संघ व इतर संघटना तर्फे मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आक्रमक झाल्या आहेत .दि.२२ डिसेंबर रोजी नागपुर येथे हिवाळी अधिवेशनावर राज्यातिल हजारो पोलिस पाटिल गावकामगार पोलिस पाटिल संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटिल याच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढणार आहेत.

या मोर्च्याच्या नियोजनासाठी उदगिर तालुका पोलिस पाटिल संघटनेची दि.१२डीसेंबर रोजी रंगराव पाटिल कृषि उत्पन बाजार समितिच्या सभागृहात उदगिर तालुका अध्यक्ष भालचंद्र शेळके पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक पार पडली.या बैठकित तालुक्यातिल सर्व पोलिस पाटिल सहभागी होउन शासना समोर आपले म्हणने मांडायचे असा ठराव घेण्यात आला.

तालुका संघटने तर्फे उदगिरचे आमदार व माजी राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांना मोर्चा स्थळी भेट देऊन पोलिस पाटलांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी विनंती निवेदन देण्यात आले.त्या वेळी त्यांनी मोर्चा स्थळी भेट देउन पोलिस पाटलांच्या मागण्या सभाग्रहात मांडण्याचे आश्वासित केले.
त्या नंतर उदगिर उपविभागाचे उप विभागिय अधिकारी प्रविनजी मेंगशेट्टी व तहसिलदार रामेश्वरजी गोरे यांना मोर्चा संबंधी व पोलिस पाटलांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन देण्यात आले .या वेळि तालुक्यातिल सर्व पोलिस पाटिल हजर होते.

“पोलिस पाटील पद हे गावातिल महसुल आणि गृह विभागाचा महत्वाचा कणा मानला जातो.राज्यातिल सर्व पोलिस पाटील गेल्या अनेक वर्षा पासुन गावातिल सर्व माहिती शासनास पुरवणारा एक दुवा म्हणुन काम करत आहे .असे असताना त्यांच्या प्रलंबित मागण्याकडे सरकार गंभिरपने बघायला तयार नाही.त्या मुळे आम्हाला मागण्या मान्य करुन घेण्यासाठी हिवाळी आधिवेशनावर धडक मोर्चा काढण्ता शिवाय पर्याय राहिलेला नाही असे विचार भालचंद्र शेळके पाटिल यांनी व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!