दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात एकमेव नांदुरा(बु) ग्रामपंचायत बिनविरोथ

दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात एकमेव नांदुरा(बु) ग्रामपंचायत बिनविरोथ

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे नांदुरा( बु ) येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायची निवडणुक बिनविरोध झाली आहे या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा दिलीपराव देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी सत्कार करून अभिनंदन केले.अहमदपूर विधानसभा मतदार संघातील मौजे नांदुरा ( बु ) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाकरिता १ जणांनी तर सदस्यांसाठी ९ जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गावचे हित डोळ्यासमोर ठेवून सक्षम असे सर्वपक्षीय पॅनल निवडणूक मैदानात उभे केले.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारात चर्चा होऊन ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला त्यानुसार विरोधात कोणीच उमेदवारी अर्ज भरले नाहीत आणि सर्वपक्षीय पॅनलला अविरोध पाठिंबा दर्शविला. या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचे सरपंच पदासाठी शिवाजी बाजीराव देशमुख यांची एकमेव उमेदवारी दाखल केली. तर सदस्य पदासाठी अनुक्रमे १) पांडुरंग रामराव बडगिरे २) प्रशांत ज्ञानोबा बडगिरे ३) कांताबाई बाबुराव मुसणे४) लक्ष्मी आजय स्वामी ५) जनाबाई लक्ष्मण जटूरे ६) अविनाश रामदास वाघमारे ७) नालंदा बालाजी कांबळे ८) सोनाली रणजीत कांबळे ९) नामदेव संभाजी वाघमारे यांनी ज्या त्या संवर्गासाठी आपली उमेदवारी दाखल केली.नांदुरा ( बु ) ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांनी त्यांच्या निवास स्थानी नुकताच सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी गावातील मूलभूत सुविधेबरोबरच गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उन्नतीसाठी प्रयत्न करून गावकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासास पात्र ठरावे असे आवाहन देशमुख यांनी केले. सदर ग्रामपंचायत सरपंचाची, व सदस्यांची निवड अविरोध व्हावी म्हणून भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, आप्पाराव देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, ज्ञानोबा बडगिरे, चंद्रकांत मद्दे, बाबुराव मुसणे, संग्राम मुसणे, व्यंकटराव पडीले, प्रदीप बडगिरे, राजेंद्र मुसणे, सुभाष मुसणे, रमेश मुसणे, गोविंद मुसणे, ज्ञानोबा बडगिरे, शिवदासआप्पा सोलपुरे, गुरु आप्पा सोलपुरे, शिवलिंग सोलपुरे, शिवहार स्वामी, सतीश मुसणे, जितेंद्र मुसणे, रंगनाथ गादगे,सांबप्पा गादगे, जगु गादगे, नागनाथ सोरडे, विश्वनाथ गादगे, प्रभाकर सोलपुरे, तुकाराम बडगिरे, जयंत देशमुख, सुरेश गुंडरे, बालाजी मनवाड, मधुकर कुकाले, बालाजी डावळे, बालाजी आढाव, राधाकिशन पांचाळ, उत्तम पांचाळ, निवृत्ती गोलेवार, भानुदास वाघमारे, सोपान भालेराव, बबन वाघमारे, भिवाजी कसबे, हिरामण चिट्टे, व्यंकट चिट्टे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!