यशवंत विद्यालयाचा गोळा फेक मैदानी स्पर्धेत जिल्ह्यात सर्वप्रथम, विभागास पात्र
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गोळा फेक मैदानी स्पर्धेत 14 वर्ष मुलांच्या वयोगटात यशवंत विद्यालयाच्या गणेश गुणाले यांनी कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून यशाची परंपरा कायम केल्याने त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
14 वर्षे मुलांच्या वयोगटात ऋषभ गुणाले, साईप्रसाद बरुरे, संग्राम जंगवाड यांनी विशेष कामगिरी केली. या विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख श्री संतोष कदम, दीपक हिंगणे, प्रभावती मिरजकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, राम तत्तापुरे, अशोक पेदेवाड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
