सुखमणि वृद्धाश्रम काजळ हिप्परगा येथे स्नेह कार्यक्रम संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी सुखमणि वृद्धाश्रम काजळ हिप्परगा ता.अहमदपूर येथे स्नेह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व वृद्धांना नवीन कपडे, जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या, सद्यस्थितीत वृद्धाश्रमात 27 वृद्ध राहत असून, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण कार्य सुखमणि वृद्धाश्रम समिती अहोरात्र प्रयत्न करत असते. स्नेह कार्यक्रमानिमित्त वृद्धांना फेटे बांधून,स्नेह भोजनाचे आयोजन करन्यात आले होते,त्यामुळे या सर्व निराधार वृद्धांना खूप आनंद आणि नविनता वाटत होती,सर्व आजी आजोबांच्या डोळे आंनदाने भरून आले होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी वृद्धाश्रम समिती चे अध्यक्ष श्री.आशिष यंगाले, मंगेश कदम,सचिन टिकोरे,अनुप सोळंके, नितीन सोळंके,दिपक हालसे, सौ.अनुसया पांचाळ,श्री. रमेश पांचाळ,सौ.अफरीन ताई शेख यांनी परिश्रम घेतले.
