बुरशीजन्य रोगामुळे झालेल्या तूर पिकाची नुकसान भरपाई मिळावी : आ.बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर व चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तूर पिकाचे बुरशीजन्य रोगामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे अतोनात नुकसान होऊन संपूर्ण पिकाचा खराटा झाला आहे. संपूर्ण तूर पिक उद्धवस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून तूर पिकाकडे पाहिले जाते. शेतकरी मोठया प्रमाणात आर्थिक अडचणी मध्ये सापडला आहे. त्यामुळे झालेल्या तूर पिकाची नुकसान भरपाई तात्काळ शेतकरी बांधवांना मिळावी, अशी मागणी अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केली.मतदारसंघात विविध ठिकाणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत शेतकरी बांधवांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न राहील, असे आमदार पाटील यांनी आश्वासन दिले. तसेच पत्राद्वारे जिल्हा कृषी अधिकारी, तहसिलदार व विमा कंपनी यांना तूर पिकाचे पंचनामे करुन शेतक-यांना तात्काळ मदत मिळणे बाबत कार्यवाही करावी, सूचना केली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार साहेब यांच्याकडे शासन दरबारी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी ज्ञानोबा कोकरे, पांडुरंग कोकरे, दयानंदराव भुशेट्टे, लातूर कृषी महाविद्यालय शास्त्रज्ञ अरुण गुट्टे, शास्त्रज्ञ डॉ.व्ही.जी. मुळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजीराव रेड्डी, माजी सभापती शिवानंद तात्या हेंगणे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सांबतात्या महाजन, वसंतराव शेटकार, ज्ञानोबा पाचापुरे, भागवत जाधव, बाळासाहेब बेडदे, सचिन घुमे, शिवाजी खिडसे, मनोज गुळवे, मोतीलाल बेंबडे, सुभाष बेडदे, सतीश बेडदे, भागवत जाधव, प्रमोद कोकरे, विशाल बेंबडे, दीनानाथ भुशेट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
