राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत अहमदपूरच्या फेन्सरचा दबदबा
17 वी कॅडेट तलवारबाजी राष्ट्रीय स्पर्धा
अहमदपूर (गोविंद काळे) : दि.11डिसेंबर ते 13डिसेंबर.महाराष्ट्र फेन्सिंग असोशियशन आणि मराठा महासंघ नाशिक यांच्य संयुक्त विद्यमाने आयोजित 17वी कॅडेट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून ईप्पी या खेळ प्रकारामध्ये आजसांघिक ( टीम ने) रजतपदकाची कमाई केली . त्यामध्ये१) माही किशोर आरदवाड२)जान्हवी गणपतराव जाधवया दोघींनी विजयश्री खेचून आणत सिल्व्हर मेडल वर आपले नाव कोरले. तसेच महाराष्ट्र च्या संघाने आपल्या पहिल्या सामन्या मध्ये दिल्ली या संघावर 15 – 5 ने मात करत कॉटर फायनल मध्ये प्रवेश केला. कॉटर फायनल मध्ये हरियाणाच्या संघाला 45 – 44 पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सेमी फायनल मध्ये चंदीगड या संघाला सुद्धा 45 – 44 पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला. फायनल मध्ये मणिपूर सोबत रौप्यपदक प्राप्त केले ईप्पी वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये 1)जान्हवी गणपतराव जाधव हिने रौप्य पदक महाराष्ट्राच्या संघाला मिळवून दिले मणिपूर विरुद्ध महाराष्ट्र असा अत्यंत अटीतटीचा आणि चुरशीचा झाला आणि 13-15गुण घेऊन जान्हवीने सिल्व्हर मेडल प्राप्त केले. तिचा देशात 2 क्रमांक आला . त्याच बरोबर माही किशोर अरदवाड देशात 5 क्रमांक आला आहेया विजयामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी दोन्ही खेळाडूंना प्राप्त झाली आहे. जान्हवी आणि माही लातूर जिल्हा फेन्सिंग असोशियशनचे प्रशिक्षक, मार्गदर्शक तथा सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.दत्ता भाऊ गलाले *अध्यक्ष प्रा.अभिजित मोरे , कोच वजिरोदिन काझी, वैभव गज्जेवाड, मोसिन शेख, डॉ.रोहित गलाले, आकाश बनसोडे, महफूसखान पठाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे महात्मा फुले विद्यालयाचे मु. अ. काबरा , यशवंत विद्यालयाचे मु. अ. गंपले, अहिल्यादेवी विद्यालयाचे मु.अ. प्रशांत माने, किलबिल इंटरनॅशनल स्कूलचे संस्थाचालक ज्ञानोबा भोसले व अहमदपूर च्या सर्व क्रीडाप्रेमी नागरीकांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
