विधवा,अपंग,परीतेक्ता महिला स्वयं सहायता समूह यांना बँक अर्थसहाय्य उपलब्ध !
अहमदपूर (गोविंद काळे) : दि.12 डिसेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अहमदपूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, अहमदपूर (तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,अहमदपूर) व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अहमदपूर च्या वतीने बँक मेळावा घेण्यात आला. यामध्ये विधवा,अपंग,परीतेक्ता तसेच इतर महिला स्वयं सहायता समूह यांना खूप मोठ्या बँक अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात आलेआतापर्यंत सदर शाखे मार्फत एकूण 50 समूहानां 10,7,40,000 ₹ बँक अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले. या वेळी उपस्थित महिलांना आर्थिक साक्षरता, PMJJY, PMSBY या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या बँक मेळाव्याला संतोष माऊलगे शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, अहमदपूर शैलेश राख तालुका अभियान व्यस्थपक, अहमदपूर नवनाथ देगणूरे तालुका व्यवस्थापक संस्था बांधणी, अहमदपूर नारायण करांडे प्रभाग समन्वयक,खंडाळीतसेच सर्व crp ताई आणि विधवा, अपंग व इतर सर्व समूहातील महिला उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमासाठीअमित शेळके उपशाखा व्यस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र धम्मानंद दाभाडे दप्तरी बँक ऑफ महाराष्ट्र अहमदपूर भाग्यश्री करांडे प्रेरिका मांगदरी अनिता दाभाडे बँक सखी शाबाना शेखप्रेरिका रुई ऊ.आदिनी विशेष प्रयन्त केले.
