महिला पतंजलि योग समितीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी मीनाक्षी स्वामी

महिला पतंजलि योग समितीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी मीनाक्षी स्वामी

उदगीर (एल.पी.उगीले) : महिला पतंजलि योग समितीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी मीनाक्षी स्वामी यांची निवड करण्यात आली आहे.महिला पतंजलि योग समिती लातूर जिल्ह्याची ऑनलाइन बैठक घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पूर्वच्या अध्यक्षा शोभाताई भागीया, सह राज्य अध्यक्षा संजीवनी माने,
संवाद अध्यक्षा महाराष्ट्र पुर्व ,उर्मिला साजणे, सोशल मीडिया अध्यक्षा मीनल कहारे, महाराष्ट्र पुर्व,राज्य कार्यकारिणी सदस्या डॉ. माधुरी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हाध्यक्षा म्हणून मिनाक्षी स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी संवाद लातूर जिल्हाध्यक्षा कलावती भातांब्रे,सोशल मीडिया लातूर जिल्हाध्यक्षा सुमती भातांब्रे, अहमदपूरच्या तालुकाध्यक्षा पुष्पा ठाकूर, चाकूरच्या तालुकाध्यक्षा सुमन पवार, देवणीच्या तालुकाध्यक्षा जयश्री खानापुरे, शिरूर अनंतपाळच्या तालुकाध्यक्षा महानंदा गजिले, औसाच्या तालुकाध्यक्षा छाया शेवाळे सह तालुका पदाधिकारी, योग शिक्षिका व साधक उपस्थित होत्या. मिनाक्षी स्वामी या २००४ सालापासून पतंजलि योग समितीच्या परिवारात सहभागी असून त्यांनी उदगीर व देवणी तालुकाध्यक्षा म्हणून उत्तम कार्य केले. तसेच लातूर जिल्हा सोशल मिडिया अध्यक्षा म्हणूनही उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मिनाक्षी स्वामी यांच्या निवडीबद्दल लातूर जिल्ह्यातील पतंजलि परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

About The Author

error: Content is protected !!