महात्मा फुले महाविद्यालयाची समीक्षा कांबळे प्रथम तर कोमल पोले ‘स्वारातीम’ विद्यापीठात तिसरी

महात्मा फुले महाविद्यालयाची समीक्षा कांबळे प्रथम तर कोमल पोले 'स्वारातीम' विद्यापीठात तिसरी

अहमदपूर (प्रतिनिधी) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गुणवत्तेच्या क्षेत्रामध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी कु.समीक्षा शेषराव कांबळे सर्वप्रथम तर, कु. कोमल संभाजी पोले ही विद्यार्थिनी बी.ए. कला शाखेत सर्व तृतीय आली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये ‘फुले पॅटर्न ‘ निर्माण केला आहे. २००९ पासून गुणवत्ता यादीत तसेच २०१६ पासून विद्यापीठात प्रथम, द्वितीय तसेच विविध विषयांमध्ये सुवर्णपदक प्राप्त करण्याचा मान महात्मा फुले महाविद्यालयाला मिळाला आहे.

हीच यशाची परंपरा कायम ठेवत उन्हाळी २०२२ च्या परीक्षेत बी. ए. कला शाखेत विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान पुन्हा एकदा कु. समीक्षा शेषराव कांबळे या विद्यार्थिनींच्या रूपाने मिळाला असून याच परीक्षेत विद्यापीठातून सर्व तृतीय येण्याचा मान कु. कोमल संभाजी कांबळे या विद्यार्थिनीनी मिळविला. याबद्दल यशस्वी विद्यार्थिनींचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील , सचिव ज्ञानदेव झोडगे तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी , प्राचार्य डॉ .वसंति बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!