गोपीनाथराव मूंडे यांना अहमदपूरात अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) :महाराष्ट्राचे लोकनेते, माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपिनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज अहमदपूर मध्ये लातूर – नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील गोपीनाथराव मुंडे चौकातील नामफलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी राज्याचे माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, जि.प.सदस्य अशोकराव केंद्रे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी,माजी नगरसेवक डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, माजी नगरसेवक संतोष शेप,भाजपा तालूकाध्यक्ष हनुमंत देवकत्ते,शिवसेना तालुकाप्रमुख गोपीनाथ जायभाये, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष बबलूखान पठाण,यतीराज केंद्रे, अँड.निखील कासनाळे,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,वंजारी सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशराव मूंडे,सरपंच बाळू मूंडे,पवन कराड,इप्पर मामा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
