प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचा कि.शि.प्र.मं.चे सचिव ज्ञानदेव झोडगे यांच्या हस्ते सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेची डी. लिट. ही सर्वोच्च मानद पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सचिव ज्ञानदेव झोडगे यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केलेल्या संशोधन, शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक आदि क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन अमेरिका येथील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेच्या वतीने त्यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील डी. लिट. ही मानद पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले.
याबद्दल ज्ञानदेव झोडगे यांनी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी फर्निचर उद्योजक बापू पांचाळ, अभियंता बबलू पांचाळ, प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे, प्रोफेसर डॉ. एन. यु. मुळे आदी उपस्थित होते.
