शांताबाई बालकिशन धूत यांच्या प्रथम पुण्य समरन निमित्याने कीर्तनाच्या कार्यक्रम

शांताबाई बालकिशन धूत यांच्या प्रथम पुण्य समरन निमित्याने कीर्तनाच्या कार्यक्रम

उदगीर (एल.पी.उगीले) : तोरणा येथे शांताबाई धूत यांच्या प्रथम पुण्य संमरन निमित्य ह.भ.प.रघुनाथ महाराज रोट्टे यांच्या मधुर वाणीतून “क्षणोक्षणी हाची करावा विचार ! करावया पार भवशिंधू !नाशिवंत देह जाणार सकळ !आयुष्य खातो काळ, निरंतर सावधान !” यां अभंगावर सोप्या शब्दात सांगितले की भगवंताने सगळ्या जन्मानंतर मानव जन्माला घातले. मानवाचा जन्म अमूल्य आहे. कारण मानवाचा जन्म अमूल्य आहे. कारण मानवाला बुद्धी आहे,तो बुद्धिजीवी प्राणी आहे.
परमार्थाला ओळखणारा मानव आहे. भगवंत दर्शन हे संताच्या माध्यमातून घडते, मानवी जीवन हे पंचतत्वाचे आहे. पांचत्त्त्वात आत्मरूपी भगवंताचा अंश आहे. वारकरी संप्रदाय मध्ये सुद्धा पंचतत्व आहेत. संत,महंत , ग्रंथ ,कीर्तन, साधक यामध्ये तीर्थ समावले जातात, देह क्षणभर, पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे, म्हणून मानवी जीवनात येऊन धार्मिक, आध्यत्मिक, नैतिक , समाजिक कार्य रूपाने वर्तन करून शेवटी या प्रपंचातून वापस जावयाचे आहे. याची खात्री करून मानवी मुल्याचे सार्थक करून जायचे आहे. माणसाने कोणत्याही गोष्टीचा अभिमान करू नये, असे सांगितले.
कीर्तनाचा लाभ अनेक गावातील पाहुणे मंडळी व गावातील असंख्य लोकांनी घेतला. त्यांना सहकार्य होलसंबर, हल्लाळी व तोरणा येथील भजनी मंडळी, वारकरी संपर्दयातील अनेक लोकांनी केले. धूत परिवारा तर्फे महराजांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .

About The Author