पेन्शनर्स डे निमित्त वृद्ध नागरिकांचा सत्कार

पेन्शनर्स डे निमित्त वृद्ध नागरिकांचा सत्कार

उदगीर (वार्ताहर) : कुणाला ऐकू येत नाही तर कुणाची दृष्टी अधुर,थरथरणा-या हातांना काठीचा आधार,शाल ऊब देणा-या या उपक्रमाचे आयोजन ‘मैत्र जीवाचे’ च्या वतीने करण्यात आले होते.१७ डिसेंबर हा ‘पेन्शनर्स डे’ म्हणून साजरा केला जातो.यानिमित्त ऐंशी वर्ष पार केलेल्या जेष्ठांचा सत्कार ‘ मैत्र जीवाचे’च्या वतीने करण्यात आला.सौ.लता कुलकर्णी ,अॕड.शेषराव कुलकर्णी ,जगन्नाथराव गुडसूरकर ,सौ.निर्मला गुडसूरकर ,सोपानराव माने
वैजनाथ पंचगल्ले, सौ.कमलबाई पंचगल्ले,देविदास नादरगे,शंकरराव साबणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रमाकांत बनशेळकीकर होते तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे उपस्थित होते. “जेष्ठ नागरिकांचा गौरव करून ‘मैत्र जीवांचे’ने कृतज्ञतेचा पथ निर्माण केल्याचे “मत रमाकांत बनशेळकीकर यांनी व्यक्त केले.विश्वनाथ मुडपे यांनी जेष्ठ नागरिक हे सामाजिक संचित असल्याचे सांगितले . रुपा बासरकर संपादित ‘संध्याछायेतले प्रकाशयात्री ‘ या अंकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.निवृत्त नायब तहसिलदार माधवराव कुलकर्णी चेरेकर दशरथ शिंदे,पांडुरंग बोडके, सौ.प्रतिभा श्रीकांत कुलकर्णी ,डॉ .संजय कुलकर्णी ,डॉ .दीपा कुलकर्णी , रुपा बासरकर, मयुर कुलकर्णी यांनी यासाठी पुढाकार घेतला. माधवराव चेरेकर यांनी आभार मानले.

About The Author