गोरक्षण काळाची गरज आहे सर्वतोपरी मदत करेन : खा. शृंगारे

गोरक्षण काळाची गरज आहे सर्वतोपरी मदत करेन : खा. शृंगारे

उदगीर (एल.पी.उगीले) : संपूर्ण भारत देशात सध्या गो पैदास आणि गोसंवर्धन कमी प्रमाणात होत पूर्वीच्या तुलनेत गोवंश अत्यल्प शिल्लक राहिला आहे. पूर्वी शेतीचा व्यवसाय गो वंशावर अवलंबून असल्यामुळे सर्रास शेतकऱ्यांच्या घरी गायींची पैदास केली जायची, त्यांची जपवणूक केली जायची. मात्र हळूहळू औद्योगीकरण वाढत गेल्यानंतर शेती व्यवसायातही यंत्रसामुग्रीचा वापर सुरू झाला. परिणामतः गोवंशाची गरज कमी झाली, त्यामुळे गाय पाळणे कमी झाले. वास्तविक पाहता भारतीय संस्कृती प्रमाणे गायीचे खूप महत्त्व आहे. त्यामुळेच गोरक्षण काळाची गरज आहे. याच उद्देशाने गोवंश हत्या बंदी कायदा बनवण्यात आला आहे.
उदगीर येथील गोरक्षण संस्थेचे काम कौतुकास्पद असून या संस्थेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून लागेल ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. असे आश्वासन लातूरचे खा. सुधाकर शृंगारे यांनी दिली.
उदगीर शहरालगत असलेल्या सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्थेस खा. सुधाकर शृंगारे यांनी भेट देऊन संस्थेची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, अभियंता संतोष तोडकर, दक्षिण मध्य रेल्वेचे उपभोक्ता समिती सदस्य मोतीलाल डोईजोडे, माजी नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. सुधाकर शृंगारे यांनी देशात गायीची संख्या कमी होत चालली आहे, अशी खंत व्यक्त करीत विदेशात आपल्या गायीची मागणी आहे, असे सांगून देशातील कमी होत असलेली गायीची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उदगीर येथील गोरक्षण संस्थेकडून गोरक्षणाचे चालू कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी खा. शृंगारे यांनी यावेळी काढले.
गोरक्षण संस्था, संघर्ष मित्रमंडळ, श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ व श्री नारायणा ऍग्रो ऑइल प्रा. लि. यांच्या वतीने खा. शृंगारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत मांगुळकर, नारायण वाकुडे, सागर महाजन, रामदास जळकोटे, नरसिंग कंदले, शंकर मुक्कावार, संतोष फुलारी, तानाजी वाकुडे, भाऊचंद पाटील, नारायण तळणीकर, इसाक भाई, रवींद्र हसरगुंडे, राजकुमार मोगले आदी उपस्थित होते.

About The Author