इनरव्हील क्लब तर्फे मोफत रक्तगट व ॲनिमिया ची तपासणी
उदगीर (एल.पी.उगीले) : सुवर्णमाता देशमुख कन्या विद्यालय येथे मोफत रक्तगट व ऍनिमिया( रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी)शिबिर उदगीर येथील इनरव्हील क्लब यांच्या वतीने घेण्यात आले. शाळेतील शंभर विद्यार्थिनींनी या शिबिराचा लाभ घेतला. सर्वांना मल्टीविटामिन औषध तसेच रक्त वाढीच्या कॅप्सूल देण्यात आल्या, या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट मॅनेजर इनरव्हील क्लबच्या जॉईन्ट सेक्रेटरी अड.नीलिमा पारसेवार या होत्या. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षिका व इतरच कर्मचारी वर्ग यांचीही रक्ताची तपासणी करण्यात आली व औषधांचे वाटप ही करण्यात आले.
या शिबिरासाठी सुवर्णमाता देशमुख कन्या विद्यालय चे मुख्याध्यापक जी.बी. बिराजदार , गव्हाने, पाटील, कांबळे, घोडके , सौ बिरादार , सो. टेंकाळे , सो. जाधव उपस्थित होते. इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सौ. मीरा चंबुले ,उपाध्यक्ष स्वाती गुरूडे , जॉईंट सेक्रेटरी नीलिमा पारसेवार, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार , इनरव्हील सदस्य अड.प्रिया नारखेडे यांची उपस्थिती होती. तसेच साई हॉस्पिटल उदगीर येथील लॅब टेक्निशियन विश्वजीत नादरगे, आकाश मडिवाळ ,सुनिता भंडारे, नेहा पंचगल्ले यांचे सहकार्य लाभले.