उदगीर तालुक्यातील 25 ग्रामपंचायत मध्ये प्रभाग निहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी

उदगीर तालुक्यातील 25 ग्रामपंचायत मध्ये प्रभाग निहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी
उदगीर तालुक्यातील 25 ग्रामपंचायत मध्ये प्रभाग निहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी
उदगीर तालुक्यातील 25 ग्रामपंचायत मध्ये प्रभाग निहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी

उदगीर (एल. पी. उगीले) : तालुक्यातील 26 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या होत्या. त्यापैकी चिमाचीवाडी या गावची ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्यात आल्यानंतर, उर्वरित 25 ग्रामपंचायत मध्ये प्रत्यक्ष मतदान शांततेत संपन्न झाले.
या 25 ग्रामपंचायत येथील प्रभाग निहाय कमाल आणि किमान मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. मोघा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक मध्ये 689 मतदारापैकी 456 मतदारांनी अर्थात 66.18% मतदारांनी हक्क बजावला. मोघा प्रभाग दोन मध्ये एकूण 662 उमेदवारापैकी 436 उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला ज्याची टक्केवारी जवळपास 66% होते. प्रभाग तीन मध्ये 724 मतदारांपैकी 541 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्याची टक्केवारी 74.72 टक्के होते. तसेच रावणगाव येथील प्रभाग एक मध्ये 742 मतदारांपैकी 635 मतदारांनी हक्क बजावला, म्हणजेच जवळपास 85.58% मतदारांनी हक्क बजावला, प्रभाग दोन मध्ये 855 पैकी 710 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच जवळपास 83 टक्के मतदान झाले. रावणगाव येथील प्रभाग तीन मध्ये ७९३ पैकी 645 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला अर्थात जवळपास 81.34% लोकांनी मतदान केले.
शंभू उंमरगा येथील प्रभाग एक मध्ये 650 पैकी 575 मतदारांनी हक्क बजावला ज्याची टक्केवारी 88.46% होते, येथील प्रभाग दोन मध्ये 834 पैकी 745 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 89.33% मतदान झाले. प्रभाग तीन मध्ये 560 पैकी 485 मतदारांनी हक्क बजावला म्हणजे 86.61% इतके मतदान झाले.
वायगाव येथे प्रभाग एक मध्ये 603 मतदारांपैकी 544 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, जवळपास 90.22 टक्के इतके मतदान या प्रभागात झाले. तर प्रभाग दोन मध्ये 571 पैकी 519 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, 90.89% इतके मतदान झाले, तर प्रभाग तीन मध्ये 620 पैकी 568 इतक्या मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 91.61% मतदारांनी आपला हक्क बजावला.
हैबतपुर येथील प्रभाग एक मध्ये 494 पैकी 425 मतदारांनी आपला हक्क बजावला म्हणजेच 86.03 टक्के मतदारांनी हक्क बजावला हैबतपुर येथील प्रभाग दोन मध्ये 312 पैकी 282 म्हणजेच 90.38% मतदारांनी आपला हक्क बजावला, हैबतपुर येथील प्रभाग तीन मध्ये 318 मतदारांपैकी 282 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच 88.68% मतदान झाले.
तीवटगाळ येथील प्रभाग एक मध्ये 96 मतदारापैकी 87 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, ज्याची टक्केवारी 90.63 होते. प्रभाग दोन मध्ये 196 पैकी 189 मतदारांनी आपला हक्क बजावला म्हणजेच 96.43% इतके मतदान झाले. तर प्रभाग तीन मध्ये 138 पैकी 136 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून विक्रमी 98.55% मतदान केले. बनशेळकी येथील प्रभाग एक मध्ये 647 पैकी 550 मतदारांनी हक्क बजावला ज्याची टक्केवारी 85 टक्के होते. प्रभाग दोन मध्ये 511 पैकी 436 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, ज्याची टक्केवारी 85.32% इतकी होते.
नेत्रगाव येथील प्रभाग एक मध्ये 513 पैकी 430 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ज्याची टक्केवारी 83.82 इतकी होते. तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये 303 मतदारांपैकी 253 मतदारांनी मतदान केले म्हणजेच 83.50 इतकी टक्केवारी होते. प्रभाग तीन मध्ये 277 पैकी 242 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 87.36% इतके मतदान झाले.
तोंडार येथील प्रभाग क्रमांक एक अ मध्ये 484 पैकी 362 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच 74.79% टक्के इतके मतदान झाले, तर प्रभाग एक मध्ये 490 पैकी 372 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 75.92 टक्के मतदारांनी हक्क बजावला. प्रभाग दोन मध्ये 641 पैकी 543 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 84.71% मतदान झाले प्रभाग क्रमांक तीन मध्ये 627 पैकी 519 मतदान झाले म्हणजेच 82.78% मतदारांनी हक्क बजावला. प्रभाग क्रमांक चार अ मध्ये 470 पैकी 373 म्हणजेच 79.39 टक्के मतदारांनी हक्क बजावला. प्रभाग क्रमांक चार मध्ये 480 पैकी 378 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 78.75 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. प्रभाग क्रमांक पाच मध्ये 861 पैकी 666 मतदारांनी मतदान केले, अर्थात 77.35 टक्के मतदान झाले.
शेकापूर येथे प्रभावी एक मध्ये 597 पैकी 531 मतदारांनी हक्क बजावला, म्हणजेच 88.94% इतके मतदान झाले. भाग दोन मध्ये 598 पैकी पाचशे अठरा म्हणजेच 86.62% इतके मतदान झाले. तर प्रभाग तीन मध्ये 556 पैकी 485 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच 87.23% इतके मतदान झाले.
तोंडचिर येथील प्रभाग एक मध्ये 712 पैकी 621 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच 87.22 टक्के इतके मतदान झाले. तर प्रभाग दोन मध्ये 716 पैकी 641 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच 89.53% मतदारांनी मतदान केले. प्रभाग तीन मध्ये 697 पैकी 604 मतदारांनी आपला हक्क बजावला 86.66% इतके मतदान झाले.
सोमनाथपूर येथील प्रभाग एक मध्ये 536 पैकी 322 मतदारांनी हक्क बजावला मतदानाची टक्केवारी 60.07% इतकी आहे. प्रभाग दोन मध्ये 656 पैकी 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच 69.66 टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक तीन मध्ये 834 पैकी599 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच 70.14% इतके मतदान झाले. प्रभाग क्रमांक चार अ मध्ये 438 पैकी 314 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच 71.69% इतके मतदान झाले, भाग चार मध्ये 480 पैकी 364 मतदान झाले म्हणजेच 75.83 टक्के मतदान झाले, प्रभाग पाच मध्ये 808 पैकी 597 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 73.89% इतके मतदान झाले.
नागलगाव येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये 685 पैकी 548 मतदारांनी हक्क बजावला. म्हणजेच 80 टक्के मतदान झाले, प्रभाग दोन मध्ये 663 पैकी 541 मतदारांनी हक्क बजावला. म्हणजेच 81.60% मतदान झाले, प्रभाग क्रमांक तीन मध्ये 450. पैकी 367 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 81.56 टक्के मतदारांनी हक्क बजावला. प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये 460 पैकी 383 मतदारांनी मतदान केले, म्हणजेच 83.26 टक्के मतदान झाले.
प्रभाग क्रमांक चार अ मध्ये 444 पैकी 375 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 84.46% इतके मतदान झाले, प्रभाग चार मध्ये 475 पैकी 420 इतके मतदान झाले म्हणजेच 88.42% मतदारांनी हक्क बजावला, प्रभाग पाच मध्ये 808 पैकी 680 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 84.16% मतदान झाले.
तोगरी येथील प्रभाग एक मध्ये 479 पैकी 389 मतदारांनी मतदान केले. म्हणजेच 81.21 टक्के मतदान झाले. तर प्रभाग दोन मध्ये 738 पैकी 610 मतदारांनी मतदान केले, सरासरी 82.66% इतके मतदान झाले. प्रभाग क्रमांक तीन मध्ये 720 पैकी 584 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 81.11% मतदारांनी हक्क बजावला.
देवर्जन येथे प्रभाग एक अ मध्ये 587 पैकी 480 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 81.77 टक्के मतदान झाले, प्रभाग एक मध्ये 653 पैकी 494 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 75.65 टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये 534 पैकी 423 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच 79.21 टक्के मतदान झाले,प्रभाग दोन मध्ये 537 पैकी 442 मतदान झाले म्हणजेच 82.31 टक्के मतदारांनी हक्क बजावला. भाग तीन मध्ये 494 पैकी 438 मतदारांनी हक्क बजावला, म्हणजेच 88.66% इतके मतदान झाले. प्रभाग क्रमांक चार मध्ये 698 पैकी 611 मतदारांनी हक्क बजावला, म्हणजेच 87.54% मतदान झाले. प्रभाग क्रमांक पाच मध्ये 508 पैकी 422 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 83.07 टक्के मतदान झाले. प्रभाग पाच अ मध्ये 420 पैकी 332 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 79.05 टक्के मतदान झाले.
डीग्रस येथे प्रभाग एक मध्ये सहाशे आठ पैकी 522 मतदान झाले. म्हणजेच 85.86% मतदारांनी हक्क बजावला, तर प्रभाग दोन मध्ये 589 पैकी 516 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 87.61 टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक तीन मध्ये 643 पैकी 570 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 88.65 टक्के मतदान झाले. सताळा (बु) येथील प्रभाग एक मध्ये 443 पैकी 385 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 86.91 टक्के मतदान झाले तर प्रभाग दोन मध्ये 524 पैकी 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजे 87.21 टक्के मतदान झाले. प्रभाग तीन मध्ये 457 पैकी 420 मतदारांनी हक्क बजावला, म्हणजेच 91.90% मतदान झाले.
मलकापूर येथील प्रभाग एक मध्ये 486 पैकी 439 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच 90.33 टक्के मतदान झाले, तर मलकापूर प्रभाग दोन मध्ये 477 पैकी 426 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच 89.31 टक्के मतदान झाले, तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये 728 पैकी 526 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच 72.25 टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक चार मध्ये सातशे पंचवीस पैकी 534 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 73.66% मतदान झाले तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये 723 पैकी 551 मतदान झाले म्हणजेच 76.26% इतके मतदान झाले.
नावंदी येथे प्रभाग एक मध्ये 675 पैकी 528 मतदारांनी आपला हक्क बजावला म्हणजेच 78.22 टक्के मतदान झाले. तर प्रभाग दोन मध्ये 590 पैकी 424 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 71.86% मतदान झाले, तर प्रभाग तीन मध्ये 630 पैकी 439 मतदान झाले म्हणजेच 69.68% इतक्या मतदारांनी हक्क बजावला.
सुकणी येथील प्रभाग एक मध्ये 570 पैकी 488 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच 85.61 टक्के मतदान झाले तर प्रभाग दोन मध्ये 483 पैकी 421 मतदारांनी हक्क बजावला म्हणजे 87.16 टक्के मतदान झाले. प्रभाग तीन मध्ये 350 पैकी 293 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 83.71 टक्के मतदान झाले.
चोंडी येथील प्रभाग एक मध्ये 443 पैकी 416 मतदारांनी हक्क बजावला, म्हणजेच 93.91 टक्के मतदान झाले. प्रभाग दोन मध्ये 431 पैकी 396 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 91.88% मतदान झाले. प्रभाग तीन मध्ये 438 पैकी 398 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 90.87 टक्के मतदान झाले.
देऊळवाडी येथील प्रभाग एक मध्ये 747 पैकी 634 मतदारांनी हक्क बजावला, म्हणजेच 84.87% मतदान झाले. प्रभाग दोन मध्ये 681 पैकी 560 मतदारांनी आपला हक्क बजावला, म्हणजेच 82.23 टक्के मतदान झाले. तसेच प्रभाग क्रमांक तीन मध्ये 675 पैकी 574 मतदान झाले म्हणजेच 85.04% मतदारांनी आपला हक्क बजावला.
कल्लूर येथील प्रभाग एक मध्ये 447 पैकी 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच 95.53% मतदान झाले. प्रभाग दोन मध्ये 424 पैकी 369 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 87.03% मतदान झाले. प्रभाग तीन मध्ये 437 पैकी 377 मतदारांनी हक्क बजावला. म्हणजेच 86.27 टक्के मतदान झाले.

उमरगा मन्ना प्रभाग एक मध्ये 426 पैकी 354 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 83.10% मतदान झाले. प्रभाग क्रमांक दोन मध्ये 286 पैकी 237 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 82.87% मतदान झाले. तर प्रभाग तीन मध्ये 383 पैकी 326 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 85.12% मतदान झाले.
मोर्तळवाडी(हा.) येथे प्रभाग एक मध्ये 430 पैकी 414 मतदारांनी हक्क बजावला आणि 96.28% विक्रमी मतदानाची नोंद केली. तसेच प्रभाग दोन मध्ये 459 पैकी 410 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सरासरी मतदान 89.32% इतके झाले. तर प्रभाग तीन मध्ये 480 पैकी 415 मतदारांनी हक्क बजावला म्हणजेच 86.46% मतदान झाले. चिमाचीवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी रामेश्वर गोरे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोष गुट्टे आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

About The Author