आ. बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; रस्ते कामासाठी १५ कोटींचा निधी मंजूर !

आ. बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; रस्ते कामासाठी १५ कोटींचा निधी मंजूर !

अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्रीय रस्ते मार्ग निधीतून (CRF) शेणकुड गावाजवळच्या नदीवरील पूल आणि खंडाळी-काळेगाव-अहमदपूर-शिरुर-उदगीर रस्त्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.नितीन जी गडकरी साहेब आणि खासदार सुधाकरजी श्रृंगारे यांचे चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आभार व्यक्त केले.

केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण देशात राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे जाळे निर्माण केलेले आहे. अहमदपूर चाकूर मतदारसंघाला राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यासाठी रस्ते मंजूर करण्यात यावीत, यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी सातत्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. या रस्ते कामासाठी केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.नितीन जी गडकरी साहेब यांच्याकडे आमदार पाटील यांनी मागणी केली होती. या मागणीची पूर्तता केल्याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांनी आभार व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!