माणसातील माणुसकी जीवंत आहे, शिल्पकार जीवन नागरगोजे यांच्या कार्यातुन सिद्ध
अहमदपूर (गोविंद काळे) : माणसातील माणुसकी जीवंत असल्याचे शिल्पकार जीवन विजय नागरगोजे यांनी आपल्या कृतितुन सिद्ध केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथुन जवळच असलेल्या माळाकोळी येथे नांदेड डेपो येथील शिवशाही बस जिचा नंबर चक96 इथ-4439 ही फेल झाली असताना जीवनाचे रान करुन वाहक सौ. सुनिता काशीराम उपवाड व चालक खंडगावे गंगाधर बालाजी यांना मदत करुन माणसात सुध्दा अजुन माणुसकी जीवंत आहे हे दाखवुन दिले आहे. दिनांक 13/12/2022 रोजी रात्री 11 वाजता नांदेड -सोलापुर ही शिवशाही ही बस नांदेड येथुन निघाली आणि माळाकोळी येथे आली असताना तिचा पुढचा डाव्या बाजुचा टायर पंक्चर झाला. त्यावेळी साधारणतः रात्रीची 1.00 ची वेळ होती त्यावेळी चालक खंडगावे व वाहक सौ. उपवाड हे टायर बदल्यासाठी परिश्रम करत होते. परंतु त्या वेळी जॅक चांगला नव्हता त्यामुळे अडचण निर्माण होत होती यावेळी शिल्पकार नागरगोजे जीवन विजय राहणार माळाकोळी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील रहीवाशी याच बसमधुन प्रवास करीत होता. मात्र तो उतरुन आपल्या घरी न जाता तो चालक खंडगावे यांना मदत करत होता.
जॅक काम करत नसल्याचे लक्षात येताच तो स्वतःची गाडी मागवुन आपल्या घरचा जॅक आणला आणि स्वतः टायर काढण्यासाठी मदत करु लागला या कामी त्यांना डॉ. बालाजी गोविंदराव कारामुंगीकर, माधव भोसले यासह अन्य प्रवासी ययांनी मदत केली. एवढ्यावरच शिल्पकार नागरगोजे हे थांबले नुसन त्यांनी स्टेफणीच्या टायरमध्ये हवा कमी असल्या कारणाने तुम्हाला या वेळेला म्हणजेच रात्रीचे 2.00 वाजण्याच्या सुमारास कोणीही उठणार नाही म्हणुन पेट्रोल पंपर्यंत स्वतःच्या गाडीवर आला. त्यांनी केलेली ही मदत खरच माणुसकी जीवंत असल्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल वाहक सौ. सुनिता उपवाड, चालक खंडगावे तसेच प्रवासी यांनी कौतुक करुन त्यांचे आभार मानले.