शालेय राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी किलबिलच्या संघाची निवड

शालेय राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी किलबिलच्या संघाची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा फुले महाविद्यालय किनगाव येथे दि 16 डिसेंबर रोजी शालेय विभागस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सदरील स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल च्या खेळाडूंनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या संघावर मात करीत राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. 17 वर्षाखालील वयोगटात शेख आयान, काटे शंभूराजे,पाटील विश्वजीत, शेख शाहिद, मिरदोडे सिध्देश्वर,मयुर पळसकर, गोडभरले संस्कार, सूर्यवंशी ऋषिकेश, भोसले अभय,सूर्यवंशी विराज, यांनी विभागस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. वरील सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक विशाल सरवदे , इरफान अकोले, अभिजित बी. एल, मधुकर दासरे, शुभम गुंजरगे यांचे संस्थेचे सचिव आदरणीय ज्ञानोबा भोसले व मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक महावीर गोडभरले व पालकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!