उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठ फुटबॉल संघात निवड

उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठ फुटबॉल संघात निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीरचे खेळाडू किशोर मसलगे आणि विश्वजीत पवार यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. दिनांक 19 ते 24 डिसेंबर 2022 दरम्यान पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा राणी दुर्गावती विश्वविद्यालय, जबलपूर येथे आयोजित होणार आहेत. या स्पर्धेमध्ये ते विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे, प्रा. रोहन ऐनाडले यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अ‍ॅड प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया आणि अ‍ॅड.सूर्यकांत पाटील, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!