महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या उन्हाळी 2022 परीक्षेत पदव्युत्तर परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थाचालकांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये कांबळे सीमा किशनराव प्रथम, नामवाड ऋत्विज सूर्यकांत द्वितीय,चौसस्टे प्रीती श्रीधर तृतीय हे विद्यार्थी एम.एस्सी.कम्प्युटर मॅनेजमेंट या विषयात गुणवत्ता यादीत आलेले आहेत. शेख समरीन प्रथम सदा सना द्वितीय एम.ए.उर्दू मध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत. एम.ए.इतिहास मधून मिथुन तानाजीराव प्रथम आणि संध्या अनिल रोडगे द्वितीय, एम.ए.समाजशास्त्र मधून श्रीमंगले ओंकार प्रथम तर एम. एस्सी.दुग्धशास्त्र या विषयात बानाईत रोहित द्वितीय आला आहे. एम.ए.हिंदी मध्ये केंद्रे साधना विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम आली आहे. याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे संस्थेचे सर्व सदस्य आणि प्राचार्य, उपप्राचार्य यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अॅड प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया आणि अॅड.सूर्यकांत पाटील, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी अभिनंदन केले.