मातोश्री मीनाताई ठाकरे माध्यमिक आश्रम शाळेने केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

मातोश्री मीनाताई ठाकरे माध्यमिक आश्रम शाळेने केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

उदगीर (जावेद शेख) : केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या तोंडार केंद्र अंतर्गत विज्ञान प्रदर्शनात केंद्रातील सर्व सहभागी शाळातून मातोश्री मीनाताई ठाकरे माध्यमिक आश्रम शाळा लोणी, तालुका उदगीर जिल्हा लातूर या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे. ‘पाण्याची सुयोग्य व्यवस्थापन’ या विषयावर आधारित नगर पालिका पाणी व्यवस्थापनास मार्गदर्शक असा हा प्रयोग होता. या प्रयोगाअंतर्गत ओव्हर फ्लो होणाऱ्या पाण्याची सुयोग्य व्यवस्थापन करण्यात आलेले होते, प्रयोगाचे सादरीकरण कुमारी करिष्मा संतोष चव्हाण या विद्यार्थिनीने केले .प्रयोगाचे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर तसेच श्रीमती मुनगीलवार मॅडम यांनी केले. प्रथम क्रमांक आल्याबद्दल संस्थेचे सचिव श्री. सौदागर बी .एम. सर तसेच अध्यक्षा श्रीमती सौदागर एस .बी. मॅडम यांनी अभिनंदन केले. केंद्रप्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे मॅडम तसेच केंद्रातून मीनाताई ठाकरे माध्यमिक आश्रम शाळा प्रथम आल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!