संत गाडगे महाराजांचे विचार सामाजिक आरोग्यासाठी गरजेचे – डॉ. शरदकुमार तेलगाने

संत गाडगे महाराजांचे विचार सामाजिक आरोग्यासाठी गरजेचे - डॉ. शरदकुमार तेलगाने

उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे स्वच्छतेच्या संदर्भातील विचार प्रत्यक्ष कृतीत आणून युवा पिढीने कार्य केल्यास शाश्वत विकासाकडे समाजाची वाटचाल व्हायला वेळ लागणार नाही. तसेच स्वच्छता निर्माण होईल. आणि कोणतीही रोगराई पसरणार नाही. त्या दृष्टीने सर्वांनी संत गाडगेबाबांचे विचार अंगीकारावेत असे आवाहन प्रबोधनकार तथा कीर्तनकार, प्रसिद्ध डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संत गाडगे महाराज चौक उदगीर येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन ही करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजयभाऊ राठोड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे तालुकाप्रमुख कैलास पाटील, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा माजी नगरसेवक गणेश गायकवाड, काँग्रेसचे माजी नगरसेवक नरसिंग शिंदे, भाजपाचे संघटक मंत्री नवज्योत शिंदे, धोबी समाज अध्यक्ष अमोल गाजरे, प्रशांत शिंदे, संतोष गाजरे, बालाजी भालेराव, विजय तेलंगे, महादेव गाजरे, रवी देगलूर, बालाजी गाजरे, अभिजीत कलुरे, अमोल तेलंगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेच्या सोबतच समाजातील आणि आपल्या परिसरातील स्वच्छतेकडे ही लक्ष द्यावे, असेही आवाहन याप्रसंगी डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी केले. या कार्यक्रमासाठी धोबी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author