ग्रामपंचायतच्या निवडणुका संपन्न झाल्या, मात्र त्याचे परिणाम आगामी निवडणुकांवर होणार हे निश्चित!

ग्रामपंचायतच्या निवडणुका संपन्न झाल्या, मात्र त्याचे परिणाम आगामी निवडणुकांवर होणार हे निश्चित!

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या, या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रितपणे प्रयत्न करून, अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या सरपंच पदाच्या उमेदवारांचा पराभव करण्यात यश मिळवले आहे. असे असले तरीही या 39 ग्रामपंचायत मध्ये सर्वाधिक ग्रामपंचायत या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्या आहेत. आता या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे काही निर्लज्ज कार्यकर्ते आमच्यामुळेच हे घडले, असे सांगत असले तरी या घटनेचे भावी पडसाद राष्ट्रवादीसाठीच अत्यंत घातक आहेत. हे निश्चित!
उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय बनसोडे यांनी या निवडणुकीच्या दरम्यान “मी सर्वांचाच” असा वांझोटा आदर्शवाद सांगत कार्यकर्त्यांना खुली सूट दिली. त्याचेच परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी कारवाया राजरोसपणे केल्या, विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे संजय बनसोडे निवडून आले, अर्थात त्यांनी जाहीर सभेत तशी ग्वाही दिली होती! अशा व्यक्तींच्याही विरोधामध्ये उघड उघडपणे सभा घेऊन विरोध केला! त्यालाही आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे जनतेमध्ये या संदर्भात कुजबुज स्वरूपामध्ये राष्ट्रवादी बद्दल चीड व्यक्त केली जाते आहे.
येणाऱ्या काळात घडीची टिकटिक थांबेल अशीही चर्चा होत आहे. स्वयंघोषित कर्तबगार कार्यकर्त्यांनी आमच्यामुळे पक्ष मोठा झाला असे सांगून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा सपाटा चालवला आहे, त्या कार्यकर्त्यांना उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून आणता आला नव्हता, ही त्यांच्या कर्तबगारीची पावती आहे! किंवा कित्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपल्या गावातही कोणी विचारत नाही, अशी परिस्थिती असताना देखील ज्या काँग्रेस पक्षाच्या जीवावर आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसने राष्ट्रवादीला मोठे केले. त्याच काँग्रेसच्या पाठीत खंजर खूपसतांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काहीच वाटले नाही, आणि गंमत म्हणजे आता फुशारक्या मारत काँग्रेसचा पराभव झाला असे जरी म्हणत असले तरी अनेक ठिकाणी अशाही परिस्थितीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुका प्रत्यक्ष राजकीय पक्षाच्या चिन्हावर नसल्या तरी कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे यावरून त्या गावातील ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात गेली, हे निश्चित होते. याचाच अंदाज घेतल्यास सद्यस्थितीत उदगीर आणि जळकोट तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्या असल्याचे दिसून येत आहे. मात्र माजी आ. भालेरावजी ज्या पद्धतीने या 39 पैकी 32 ग्रामपंचायती या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत, असे सांगत आहेत, हे साफ चुकीचे आहे. त्यांना कार्यकर्त्यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. कारण त्यांनी जी यादी सांगितली त्या यादी पैकी, शंभू उमरगा येथील पॅनल प्रमुख तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी गेल्या पंधरा वर्षापासून सक्रियपणे ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणारे वसंतराव पाटील यांनी जाहीरपणे आम्ही राष्ट्रवादीचे आहोत! आणि आमची ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीचीच आहे. असे सांगितले आहे. तशाच पद्धतीची अवस्था इतरही काही गावांमध्ये आहे. शिवसेनेने अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने दोन आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाने दोन अशा चार ग्रामपंचायती बाजूला केल्यास, उर्वरित 35 पैकी 32 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात नाहीत, यापैकी बहुतेक ग्रामपंचायती या काँग्रेसच्या ताब्यात देखील आहेत, काही ग्रामपंचायत मध्ये कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान क्रॉस वोटिंग करण्याचा सल्ला दिल्यामुळे, काँग्रेसच्या सरपंच असलेल्या किंवा राष्ट्रवादीचे सरपंच असलेल्या ग्रामपंचायत मध्ये एखादा दुसरा सदस्य भारतीय जनता पक्षाचा निवडूनही आला असेल, म्हणजे ती ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाची झाली, असे म्हणता येणार नाही. एकंदरीत निवडून आलेल्या उमेदवारांकडे पाहिल्यास हे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
मोघा येथून काळोजी शिलाबाई देविदास, नराचे नेताजी प्रल्हाद, काळोजी प्रमोद देविदास, सैदपुरे बालिका बालाजी, कुंभार आनंद विश्वनाथ, बिरादार भाग्यश्री संदीप, बिरादार शुभांगी संगमेश्वर, कांबळे मालू नागोराव, काळोजी अनुसया संभाजी, बिरादार पद्मावती बालाजी हे विजयी झाले आहेत. तर रावणगाव येथून पाटील लक्ष्मीबाई हनुमंतराव, सूर्यवंशी हनुमंत विठ्ठल, फकीर पाशा इब्राहिम, शेख कासिम साब मनोद्दीन, पटेल सलाउद्दीन जाफर, मेत्रे रोहिणी बालाजी, मेकलवाड फुलाबाई सिकंदर, पाटील योगेश शिवशंकर, खंडूमलके शिलादेव आडपा, पटेल शबाना मुक्रम हे विजयी झाले आहेत.
शेकापूर येथून शेळके उर्मिला विठ्ठल, शिंदे मनोहर विश्वनाथ, हलकरे संदीप व्यंकटराव, सावंत सविता शिवाजी, कोनाळे अंकुश रामराव, घुगे अंजली सतीश, कोणाळे सुनीता उद्धव, शेल्हाळे अविनाश लहू, हनुमंते केवळबाई अंगद, नवाडे आशा बाळासाहेब हे विजयी झाले आहेत.
तोंडचिर येथून पाटील सुनिता मदनकुमार, भोसले तानाजी वामनराव, जाधव भागीर्ताबाई निवृत्ती, चिल्लरगे कविता वैजनाथ, टांगाटूरे राजपाल पांडुरंग, जाधव लता मधुकर, कांबळे सुकुमार रोहिदास, जाधव दत्तात्रय रामदास, भुताळे लखजाबाई सुभाष, हुगे संध्या दयासागर हे विजय झाले आहेत. हैबतपुर येथून नरहरे अनुराधा तुकाराम, शिंदे दुष्यंत सोपानराव, आलमूनबी अहमद सय्यद, पठाण सलीमाबी खाजाउद्दीन, दंडीमे सुधाकर संदिपान, बिरादार शोभा विरभद्र, वाघमारे मुकुंद ईश्वर, तेलंगपूरे उषा दिलीप हे विजयी झाले आहेत.
तीवटग्याळ येथून पाटील प्रशांत काशिनाथ, नरहरे उज्वला वेंकट, कांबळे सखुबाई त्र्यंबक, पाटील जयसिंग हरिबा, कांबळे सरुबाई मनोहर, तवर आरती कैलास, पाटील जनार्दन सोपानराव, पाटील वर्षा आकाश हे विजयी झाले आहेत.
बनशेळकी येथून शेळके नरसिंग नामदेव, शेख अबू हुज्जेब, कांबळे सूल्याबाई कामाजी, गठोडे संगीता मनोहर, पाटील महादेव दिलीप, कांबळे भारतबाई शंकर, लोहारे महादेवीबाई महादेव, चिखलचांदे अंबादास वेंकटराव, महाजन विवेक रामचंद्र, सूर्यवंशी सुमनबाई उमाकांत हे विजय झाले आहेत.
नेत्रगाव येथून पाटील हेमलता बालाजी, बिरादार दत्तात्रय अर्जुनराव, शिंदे लक्ष्मीबाई मल्हारी, पाटील ललिताबाई हनुमंतराव, वडले महादेव खुशालराव, कांबळे अंबिका अशोक, नेत्रगावकर अमोल माधव, बिरादार लक्ष्मी धनाजी हे विजयी झाले आहेत.
तोंडार येथून कोचेवाड भरत मारुती, लिंबाळे सागर काशिनाथ, कोचेवाड सारिका दिगंबर, वैशाली महेश्वर शिवदासे, बिरादार रामेश्वर बाबुराव, लासुरे निर्मलाबाई राजेंद्र, नावंदे प्रयाग शिवलिंग, सोनकांबळे मनोहर विठोबा, पांडे पदमीनबाई गंगाधर, बिरादार निळकंठ प्रभूराव, कांबळे छायाबाई मिलिंद, सुरनर मश्णाजी वेंकट, वाघमारे गणपत नामदेव, सरमंगला मनोहर बिरादार हे विजयी झाले आहेत.
शंभू उमरगा येथून स्वामी लिंगेश्वर दिलीप, सूर्यवंशी धर्मेंद्र ज्ञानोबा, हिंगमिरे शिवशंकर मनोहर, बानापुरे ज्योती रंजीत, पाटील वसंत सुभाष, मदने बकुळाबाई मल्लिकार्जुन, गंगथडे मनीषा संग्राम, आवले रवींद्र निवृत्ती, मदने कोष्यल्या शिवाजी, गुडे प्रेमीला मधुकर विजयी झाले आहेत.
वायगाव येथून कांबळे काशीबाई दत्तू, वाघमारे किरण भगवान, पाटील नरसिंग मनोहर, गायकवाड राजश्री बाळासाहेब, वाडकर लक्ष्मण महादेव, वाघमारे अर्चना सतीश, घाटके वैशाली शिवानंद, बेळकुंदे अविनाश मुरलीधर, मोरे अहिल्याबाई मधुकर, गायकवाड अनुराधा अनिल हे विजय झाले आहेत.
सोमनाथपूर येथून पवार अंबिका ज्ञानेश्वर, माडे अमितकुमार तुकाराम, चव्हाण सुजाता किशन, राठोड सुभाष मोतीराम, घोगरे अश्विनी मुकेश, शिंदे अभिनव संजय, निरने ओमकार सोमनाथ, वैजापूरे श्रीदेवी राजकुमार, आडेपाटील शुभम विदेश, अंधारे शिवकर्ण सोनबा, पाटील विमल प्रभू, राठोड लक्ष्मण दासू, बामणे अश्विनी नामदेव, आडे सुमन नामदेव विजय झाले आहेत.
नागलगाव येथून राठोड सुभाष मुन्ना, सोनेवाड पांडुरंग किसन, गुंडरे रंजना माधव, गुडसुरे बसवराज बाबू, पाटील साधना ओमप्रकाश, कांबळे नेताजी शिवाजी, पाटील राम गोविंदराव, कांबळे अंबिका मुरलीधर, चव्हाण सतीश रमेश, भाटकुळे मनीषा भीमराव, चव्हाण वंदना लक्ष्मण, जाधव विकास नारायण, करंजे अश्विनी चंद्रपाल, राठोड अरुणाबाई दिगंबर हे विजयी झाले आहेत.
तोगरी येथून गुरुस्थळे अश्विनी नागप्‍पा, बनसोडे प्रदीप गोरख, येरनाळे प्रतिभा धनराज, काळा रवींद्र युवराज, लक्ष्मीबाई भानुदास सूर्यवंशी, मीना सुधाकर संगेवार, तेलंग राजकुमार विठ्ठलराव ,शेख मस्तान पाडाअहमद, काळा महानंदा नागनाथ, गुरुस्थळे नागप्‍पा रेवनअप्पा, चव्हाण दैवशाला प्रेमकुमार, रामले शोभा वैजनाथ हे विजयी झाले आहेत.
देवर्जन येथून साकोळकर अभिजीत चंद्रप्रकाश, शेख नवाज सर्फदिन, गिलचे राजश्री सिद्धार्थ, वाडीकर दैवशाला वैजनाथ, कांबळे चंद्रकांत गोविंद, खटके बालाजी अंकुश, रोडगे मन्याबाई राजकुमार, मातोळे सुधाकर माणिक, एलमटे मीरा राम, चंदे बालाजी गोविंद, बिरादार लता सुरेश, दंडे पांडुरंग परवा, कांबळे अनुसया अशोक, रोडगे सरोजा विनोद हे विजयी झाले आहेत.
डीग्रस येथून ढगे चंद्रसेना ज्ञानोबा, गायकवाड जीवन भानुदास, पुठेवाड प्रवीण सूर्यकांत, रेश्मा शाकीर शेख, शालुबाई वामन कोंपले, यशोदा वामन गायकवाड, आयोध्या सूर्यकांत ढगे, पाटील प्रमोद निवृत्तीराव, डोबाळे अनुराधा देविदास, मिनाबाई भगवान डोबाळे हे विजयी झाले आहेत.
सताळा बु. येथून तिरकोळे कुसुमबाई वाघम्बर,बिरगे गुणवंत दत्तात्रेय, सतालकर रुक्मिणी नागनाथ, नरहरे अयोध्या प्रशांत, जळकोटे सिद्धेश्वर गुंडप्पा, कांबळे विमलबाई जनार्दन, बालने सुकुमार नरसिंग, मदने माणिक रामकिसन, सुडे सचिन वेंकटराव, बोणे अनिता मोतीराम हे विजयी झाले आहेत. मलकापूर येथून बिरादार गुरुनाथ देवराव, पाटील सतीश हनुमंतराव, पवार सुप्रिया गंगाधर, पवार दत्तात्रय खंडेराव, भालेराव महानंदा राजेंद्र, बोडके जितेंद्र रामचंद्र, तोडकर महेश प्रभूराव, पाटील सोनाबाई बळवंतराव, पवार सचिन परशुराम, मेहेकरे चंद्रकला दिलीप, शेख आशाबी महबूबसाब, शेख मेहबूब अहमद ,महेंद्रकर दीपा बालाजी, सय्यद परवीन अतिक हे विजय झाले आहेत.
नावंदी येथून केंद्रे ब्रह्माजी माधवराव, केंद्रे बालाजी दगडोबा, सूर्यवंशी छायाबाई संतोष, ज्योती महेश पाटील,पुल्ले बालाजी नामदेव, वाघमारे उषा विकास, बिरादार ज्योती अमोल, मादळे विक्रम लहू, उगीले शिवाजी संग्राम, कांबळे करुणाबाई अशोक हे विजय झाले आहेत.
सुकणी येथून जाधव अशा नागनाथ, सुकणे शिवाजी रावसाहेब, गोटमुकले सुलोचना सौदागर, कनकुरे सुनीता गंगाधर, केदासे ऋषिकेश गोविंदराव ,पाटील सूर्यकांत नारायणराव, सुकणे जिजाबाई बळवंत, मुळे विकास जीवनराव, मुळे शिवनंदा भगवान, घोणसे शोभा मारुती हे विजय झाले आहेत.
चोंडी येथून पाटील विठ्ठलराव माणिकराव, गायकवाड विश्वनाथ पुंडलिक, कोळगिर परमेश्वर पुंडा, जिंकलवाड विमलबाई खंडू, करेप्पा गुंडेराव भाऊराव, कांबळे धुराबाई ज्ञानोबा, शेळके मधुबाला गोविंदरेड्डी, जिंकलवाड पांडुरंग नारायण, पवार महादाबाई शिवाजी, गजाई साखरबाई मारोती हे विजय झाले आहेत.
देऊळवाडी येथून केंद्रे शुभम चंद्रकांत, केंद्रे संतोष तुकाराम, गडीकर सवित्रा रमेश, मुंजेवार रेशदबी महंमद, केंद्रे रेणुका मारुती, ढोले बाजीराव दिगंबर,गुट्टे शोभाबाई तुकाराम, बलांडे भीमराव संग्राम, केंद्रे शितल हनुमंत, गडीकर शशिकलाबाई बापूराव हे विजयी झाले आहेत.
कल्लूर येथून कुंडगीर लक्ष्मण राजकुमार, बाजगीर राम अंकुश, कल्लूरकर माधुरी किरण, देवकते कविता राम, कांबळे मनोज संभाजी, बिरादार परीक्षित बालाजी, पाटील सुनंदाबाई अनिल, आमगे भीमराव रंगराव ,सोमासे वंदना विनायक, तांबोळी तुहरा मशकूर हे विजयी झाले आहेत
उमरगा मन्ना येथून सलगरे सावित्रीबाई विजयकुमार, हल्लाळे विनोद संभाजी, कांबळे कोमल प्रभाकर, निलेवाड सुरेखा नामदेव, कोचेवाड राजकुमार बिभीषण ,वाडकर वर्षा सुनील ,कांबळे नवनाथ मोहन, सुरनर शोभाबाई निळकंठ हे विजय झाले आहेत.
चीमाचीवाडी येथून बिनविरोधपणे दुर्गावाढ मीरा पंढरी, गुंडीले रामदास किशन, चंदे सुनंदा हरिदास, जाधव कालींदा वामन, बंडे प्रशांत गोपीनाथ, गुनाले रंजना नामदेव, गुरमे अनिल माधवराव, दुर्गावाढ मीनाक्षी प्रमोद हे सर्व बिनविरोध विजय झाले आहेत.
मोर्तलवाडी (हा.) येथून पाटील प्रभाकर व्यंकटराव, पाटील तुकाराम माधवराव, भुरे रसिका धोंडीबा, खोडेवाड वंदाबाई निळकंठ,चामे गोविंद हरिदास, उगले रंजना वसंत, मोरतळे संगीता बापूराव, भुरे अंकुश मरेप्पा, पाटील बाळासाहेब विलास, आयतलवाड उज्वला माधव हे विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच ठिकाणी सरपंच वेगळ्या पक्षाचा तर सदस्य वेगळ्या पक्षाचे असेही चित्र आहे, ठिकाणी तर सरपंच हे बिन सैन्याचे सेनापती असल्यासारखे निवडून आले आहेत, सरपंचाच्या हातात सरळ कारभार असला तरी सभागृहामध्ये त्यांची मोठी गोची होऊ शकेल अशी ही शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय नेत्यांना भविष्यात त्यांच्या या दुतोंडी खेळीचा निश्चितपणे परिणाम भोगावा लागेल अशीही चर्चा राजरोसपणे चालू आहे.

About The Author