मराठवाडा जनता विकास परिषद शाखा उदगीर च्या वतीने मराठवाडा रेल्वे परिषदेचे आयोजन

मराठवाडा जनता विकास परिषद शाखा उदगीर च्या वतीने मराठवाडा रेल्वे परिषदेचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : मराठवाड्यातील रेल्वे वाहतुकीची कमी लक्षात घेता मजवीप शाखा उदगीरच्या वतीने मराठवाडा रेल्वे परिषदेचे आयोजन केलेले आहे. ही परिषद जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात संपन्न होत आहे. परिषदेसाठी रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे , नामदार भगवंत खुबा राज्यमंत्री भारत सरकार, माजी खासदार व्यंकटेश काबदे अध्यक्ष मराठवाडा जनता विकास परिषद औरंगाबाद व सर्व मराठवाड्यातील पदाधिकारी व सदस्य तसेच मराठवाड्यातील सर्व खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये मराठवाड्यात कोणत्या भागातून रेल्वेचे मार्ग नव्याने सुरुवात करता येतील, तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गाची सुधारणा रेल्वे स्टेशनची सुधारणा त्याचप्रमाणे नवीन रेल्वे गाड्यांची सुरुवात, इत्यादी मागण्याबाबत सर्वांगीण चर्चा करण्यासाठी रेल्वे संदर्भातील अभ्यासक तज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. निश्चितच ही बाब उदगीरच्या इतिहासाला साजेशी व गौरवास्पद आहे. या उपक्रमामध्ये एक उदगीरकर म्हणून आपल्या सर्वांचा सहभाग हा मोलाचा ठरणार आहे. याकरिता विविध पातळीवर काम करण्यासाठी उदगीरचे राजकीय सामाजिक उद्योग व्यापार व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील व अन्य नागरिक एकत्र येत आहेत. यांच्या समन्वयातूनच ही परिषद यशस्वी होणार आहे. मजवीप शाखा उदगीरच्या वतीने सर्वांना नम्र आवाहन करण्यात येत आहे, आपला सहभाग या आयोजनात महत्त्वाचा आहे. याकरिता आपण आपणास शक्य ती मदत देऊन सहकार्य करावे. यासाठी सभागृह मंगल सेवा सत्कार साहित्य, छपाई, हारतुरे, वाहतूक पाहुण्यांसाठी चहा नाश्ता भोजन इत्यादीचा खर्च अपेक्षित आहे. सदर कार्यक्रमाला आपण व्यक्तिशः उपस्थित रहावे . आपले मार्गदर्शन व सूचना आम्हाला द्यावेत, त्याचप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे आर्थिक सहकार्य करावे, ही विनंती आहे.

About The Author