मृदा संवर्धनाचा संदेश घेऊन उदगीरहून 34 सायकलस्वार जगन्नाथ पुरी कडे रवाना

मृदा संवर्धनाचा संदेश घेऊन उदगीरहून 34 सायकलस्वार जगन्नाथ पुरी कडे रवाना

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील महत्वकांक्षी आणि सामाजिक जाणीव जपणारे काही तरुण आपल्या सामाजिक कार्याच्या भूमिका घेऊन देशातील विविध कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण या समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून हे सर्वजण सक्रियपणे कार्य करत आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याला खरोखरच इतरही तरुणांनी स्वीकारून मृदा संवर्धन आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपला प्रवास जास्तीत जास्त सायकल वर करावा, हा संदेश देण्यासाठी हे समाजसेवक निघाले आहेत. हे सायकलस्वार 5 राज्यांतून अर्थात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा,आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यातून जाणार आहेत. त्यांचा हा 1500 किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलवर पूर्ण करणार आहेत.
या सायकल प्रवासाची सुरुवात उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली. हे तरुण प्रवास करताना उदगीर ते सदाशिव पेठ, हैद्राबाद, सुर्यापेठ, विजयवाडा, व्दारका, तिरुमला, राजमहेंद्रवरम (राजमुन्द्री), विशाखापट्टणम, श्रीकाकुलम, ब्रम्हापुर, जगन्नाथ पुरी, साक्षीगोपाल, कोर्णाक, भुवनेश्वर असा जवळपास 1500 किलोमीटर अंतराचा प्रवास 14 दिवसात पूर्ण करणार आहेत.
साईनाथ कोरे, सुनिल ममदापूरे यांच्या नेतृत्वाखाली सायकलस्वार 2002 सालापासून दरवर्षी उदगीर ते तिरुपती हे अंतर सायकलवर पूर्ण करतात, कधी कधी स्वतः सोबत सीट बॉल ते रस्त्याच्या कडेला विविध प्रकारच्या झाडांचे बी बियाणे टाकत जातात. आपल्यासाठी नाही तरी या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सावली निर्माण व्हावी, परिसरातील नागरिकांना फळे मिळावी असा उदास ते हेतू घेऊन हे कार्यकर्ते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीचा आणि वृक्ष संवर्धनाचा संदेशही देण्यासाठी धडपडत आहेत, हे सर्वजण उदगीर मधील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे आहे, श्रद्धे सोबतच समाजकार्य करण्यासाठी ते पुढे आले आहेत. या त्यांच्या भक्तीपूर्ण सायकलस्वारीला दरवेळी सामाजिक आणि पर्यावरण संदेशाची जोड देऊन, समाजाप्रती असलेले त्यांचे उत्तरदायित्व अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमांतून सातत्यपूर्ण पणे निभावत आहात. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
सायकलींग चा एक वेगळा मापदंड निर्माण करणाऱ्या आणि उदगीरकरांची शान असणाऱ्या या टीम मध्ये साईनाथ कोरे, सुनील ममदापुरे, बालाजी इंद्राळे, जगदीश पंडित, अनिरुद्ध जोशी, बब्रुवान हैबतपुरे, अश्विन पांढरे, मुकेश निरुणे यांच्यासह अनेक तरुण या मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांच्या प्रवासाला माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या सहास पूर्ण आणि सामाजिक जाणीवा घेऊन सुरू असलेल्या प्रवासाला इतरही मान्यवरांनी शुभेच्छा देऊन त्यांच्या कौतुक केले आहे.यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष मनोजजी पुदाले, दुधीया हनुमान मंदिर संस्थान चे ओमजी विश्वनाथे उपस्थित होते.

About The Author