ज्ञानदाना शिक्षण प्रसारक मंडळ लातूरच्या वतीने साहित्यिक प्रो.डॉ. नरसिंग कदम यांचा सत्कार

ज्ञानदाना शिक्षण प्रसारक मंडळ लातूरच्या वतीने साहित्यिक प्रो.डॉ. नरसिंग कदम यांचा सत्कार

उदगीर : कवी, कथाकार, वात्रटिकाकार, समीक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रोफेसर डॉ. कदम नरसिंग यांचा ज्ञानदाना शिक्षण प्रसारक मंडळ लातूर चे सचिव प्रा.डॉ. दिलीप गुंजरगे , संस्थेच्या समन्वयक तथा मुख्याध्यापिका सौ. मनीषा शिंदे गुंजरगे यांनी जाहीर सत्कार केला. डॉ कदम यांना मिळालेल्या विविध पुरस्कारामुळे संस्थेच्या वतीने गुणगौरव करण्यात आला. ज्ञानदाना शिक्षण प्रसारक मंडळ एक उपक्रमशील मंडळ आहे. मुख्याध्यापिका सौ. मनीषा शिंदे गुंजरगे यांनी विद्यार्थीकेंद्री विविध उपक्रम राबविलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन प्रयोग त्या राबवत असतात. म्हणूनच शाळेने लातूरसारख्या ठिकाणी आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रांमध्ये डॉ.कदम नरसिंग यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांनी जाहीर सत्कार केलेला आहे. या सत्कार प्रसंगी सचिव डॉ. दिलीप गुंजरगे म्हणाले, डॉ कदम यांनी एकाच वेळी सामाजिक क्षेत्रामध्ये आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये आपला चांगला ठसा उमटवलेला आहे.त्यामुळेच त्यांना साहित्यिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. आम्हालाही त्यांचा सत्कार करण्याची संधी त्यांनी दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. सत्काराला उत्तर देत असताना साहित्यिक कदम म्हणाले, अशा सत्कारामुळे आमच्या सामाजिक कार्याला, साहित्यिक कार्याला प्रेरणा मिळत असते. आमच्या कामाला गती येते .माझा यथोचित सत्कार केला त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ चौधरी एच जे तर आभार डॉ खाकरे आर डी यांनी मानले.

About The Author