उदगीर मतदार संघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध झाले – बस्वराज रोडगे

उदगीर मतदार संघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध झाले - बस्वराज रोडगे

उदगीर (एल.पी.उगीले) : काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना धक्का देत भाजपने उदगीर तालुक्यातील 26 पैकी 20 जागा जिंकल्या आहेत. या निवडीमुळे माजी राज्यमंत्र्यांना पण धक्का दिला आहे, कारण या भागातील मतदार हा पैशाने विकला जाऊ शकणारा नाही, तर स्वाभिमानाने मत देणारा आहे. हे यावरून सिद्ध झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सरकारवर विश्वास ठेवून त्यांच्या कार्याला पसंती देऊन मतदाराने मत दिले.असे भाजपचे तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.मतदार संघातील सर्व मतदारांचे त्यांनी अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत. व निवडून येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जाणार असल्याची माहिती दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!