श्यामलाल मेमोरियल हायस्कूलमध्ये गणित दिवस उत्साहात साजरा !

श्यामलाल मेमोरियल हायस्कूलमध्ये गणित दिवस उत्साहात साजरा !

उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये सुप्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ श्री रामानुजन यांचा जन्मदिन गणित दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक आनंद चोबळे सर होते तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ. भालचंद्र करंडे हे उपस्थित होते गणित दिवसाचे औचित्य साधून प्रमुख पाहुण्यांनी गणित विषय आपल्या दैनंदिन जीवनासोबतच शैक्षणिक दृष्ट्या किती महत्त्वाचा आहे हे सांगितले त्याबरोबरच गणित विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपॉर्च्युनिटी किती आहेत, कशा आहेत, कोण कोणत्या डिपार्टमेंटला आहेत, त्यासाठी लागणारे पात्रता काय यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपामध्ये मा. मुख्याध्यापक साहेबांनी ज्यांना गणित जमले त्यांना संपूर्ण आयुष्याचे गणित जमले असे सांगितले.
याप्रसंगी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲड.सुपोषपाणी आर्य यांनी सर्व गणित विषयशिक्षकांना व विद्यार्थ्यांना गणितदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमामध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे सहभाग नोंदवला यामध्ये प्रामुख्याने गणित विषयाची भित्तीपत्रक,गणितीय प्रकल्प,गणितीय चारोळ्या,गणितीय गीत, गणितावर नाटक याचे सादरीकरण खूप चांगल्या प्रकारे केले.
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमच्याच विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी यशश्री मुदुडगे हिने केले. या कार्यक्रमासाठी आमच्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री बालाजी चव्हाण सर पर्यवेक्षक श्री राहुल लिमये सर गणित विभागाचे विभाग प्रमुख धनश्री जाधव मॅडम तसेच गणित विभागाचे सर्व शिक्षक वृंद हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आभार श्री राहुल नादरगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author

error: Content is protected !!