महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना सुवर्णपदक
उदगीर : दि. 22 डिसेंबर 2022 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने 25 वा दीक्षांत समारंभ 14 जानेवारी 2023 रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. यात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त होणार आहे. बी.सी.ए. मधून सर्वप्रथम आलेली दिवे यशोदा राम हिला कर्मयोगी दत्तरावजी अडकिने सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. एम.ए.हिंदी मध्ये सर्वप्रथम आलेली केंद्रे साधना देविदास हिला कै.नानाजी देशमुख राजभाषा पुरस्कार सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी मधून पदवीच्या तिन्ही वर्षात सर्वाधिक गुण प्राप्त करणारी शेख समरीन रौफ हिला स्व.चंद्रशेखर सदाशिव अग्रवाल सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. एम.ए.इतिहास मधून सर्वप्रथम आलेला मिथुन तानाजीराव या विद्यार्थ्यास सौ.रमा अनिल कठारे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे तर एम.ए. समाजशास्त्र सर्वप्रथम आलेला विद्यार्थी श्रीमंगले ओंकार सुधाकर याला श्री.मुरलीधर एकनाथ कठारे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. याबद्दल त्यांचे विभाग प्रमुख, सर्व सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापकांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अॅड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया आणि अॅड.सूर्यकांत पाटील, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
