आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून ४४२ कि.मी. लातूर ग्रामीण मधील रस्‍त्‍यांना जिल्‍हा मार्गाचा दर्जा

आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून ४४२ कि.मी. लातूर ग्रामीण मधील रस्‍त्‍यांना जिल्‍हा मार्गाचा दर्जा

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्‍या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ४४२ किलोमीटर रस्‍त्‍यांना भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून जिल्‍हा मार्ग म्‍हणून राज्‍य शासनाने १६ डिसेंबर २०२२ रोजीच्‍या शासननिर्णय पत्रकाद्वारे दर्जा दिला आहे. यामुळे राज्‍य शासनाच्‍या विविध योजनेच्‍या माध्‍यमातून सदरील रस्‍त्‍यांच्‍या विकास कामांना येत्‍या काळात निधी उपलब्‍ध होवून गती मिळणार आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १) रा. मा. २३६ ते कानडी बोरगाव – तांदूळजा- रा. मा. २११ ते मसला – भिसे वाघोली – खुंटेफळ – माटेफळ ते रा. मा. २११ – मुरूड पर्यंत एकुण २९ कि.मी., २) रा.मा. २११ ते वाडीवाघोली- माटेफळ- करकट्टा रामा ६३, म. मा. ६३ मुरूड- निवळी- भेटा ते भेटा- अंदोरा- शिवली रा. मा. ६८ पर्यंत एकुण ३५ कि.मी., ३) रा. मा. २११ ते प्रजिमा भिसे वाघोली- मसला- गाधवड रा. मा. २३६ वांजरखेडा प्रजिमा पर्यंतचा रस्‍ता एकुण १४.५०० कि. मी., ४) प्रजिमा-५ वांजरखेडा- वांजरखेडा तांडा रा. मा. २३६- पिंपरी अंबा- येळी- प्रजिमा १३- मांजरी- सामनगाव- आखरवाई- हरंगुळ बु. -प्रजिमा ५८ ते रा मा ६३ पर्यंत एकुण २०.७०० कि.मी., ५) प्रजिमा-५ रामेश्‍वर- रा. मा. २३६- लमाणतांडा -१,२ प्रजिमा १३ चिंचोली ब.- प्रजिमा-९- रामेगाव ते रा. मा. ६३ पर्यंत एकुण १९.५०० कि.मी., ६) प्र.जि.मा. १३ ते चाटा- बोपला- कवठा – बोरगाव- आंदोरा – जायफळ ते जिल्‍हा हद्दपर्यंत एकुण २४.५०० कि.मी., ७) चिंचोली ब- मांजरी- प्रजिमा- १२- (चिखुर्डा) प्र.जि.मा.-९ ते साखरा रा. म. मा. ६३ ते अंकोली- प्र.जि.मा.-११- शिऊर- उटी खु. – धानोरा – टाकळी शि. पर्यंत एकुण २३.५०० कि.मी., ८) प्र.जि.मा.-९ (आखरवाई)- रा. म. मा.-६३- मांजरा कारखाना – चिंचोलीराववाडी – रा. मा. २४२ ते खंडापूर- पाखरसांगवी- खाडगाव रा. म. मा.- ५४८ बी ते रा. मा. १४५ पर्यंत रस्‍ता. एकुण २०.८०० कि.मी., ९) प्र.जि.मा.-३- प्र.जि.मा.-४ डिगोळ देशमुख- पोहरेगाव-शेरा ते प्र. रा. मा.- ५४८ बी पर्यंत रस्‍ता. एकुण १२.५०० कि. मी., १०) प्र.जि.मा.-३ ते मोरवड – पळशी- प्रजिमा- ३- इट्टी – पोहरेगाव- आंदलगाव – सांगवी – इंदरठाणा- नागझरी – रायवाडी – वरवंटी – रा. मा.- २३६ ते प्रस्‍तावित प्र.जि.मा. पर्यंत रस्‍ता. एकुण ३७.८०० कि. मी.,११) प्रस्‍तावित प्र.जि.मा. ते आंदलगाव- सिंदगाव – निवाडा – रा. म. मा. ५४८ बी – बावची ते बिटरगाव प्रजिमा-३ पर्यंत रस्‍ता. एकुण १३ कि.मी., १२) प्रस्‍तावित प्र.जि.मा. – वाला- सेवादासनगर – बिटरगाव – सुमठाणा – समसापूर – रा. म. मा.- ६३ – रेणापूर रस्‍ता एकुण २०.५०० कि. मी., १३) रा.मा. ५४८ बी ते गव्‍हाण – ब्रम्‍हवाडी- दर्जीबोरगाव- इंदरठाणा – आरजखेडा – साई – महापूर – सेलू खु. रा. म. मा. ६३ – रामवाडी – रा .मा. २४८ – कुंभारवाडी – धवेली – प्रजिमा – १५ पर्यंत रस्‍ता एकुण ३५ कि. मी., १४) प्र.जि.मा. -२ वाला- कामखेडा – रा. म. मा. ६३- रेणापूर – हाके तांडा – वसंतनगर- ते रा. म. मा. ५४८ बी रस्‍ता. एकुण २७ कि.मी., १५) रा. म. मा.-६३ – (लातूर) नवीन रेल्‍वे स्‍टेशन- प्रजिमा-४- नांदगावमोड- बोरवटी- कासारगाव – हणमंतवाडी- मळवटी- कासारखेडा रा. मा. २४८ ते चिकलठाणा- भातांगळी – भडी – प्र.जि.मा. – १७ पर्यंत रस्‍ता एकुण २९.७०० कि.मी., १६) प्र.जि.मा.-१ फावडेवाडी – मुसळेवाडी – पानगाव – रा. म. मा. ३६१ एच ते कारेपूर- सय्यदपूर – प्र.जि.मा. – १५ – धवेली – कवठाळी – आनंदवाडी – रा. म. मा. ६३ – ते बामणी – भातांगळी – रा. म. मा. ३६१- भाडगाव – सोनवती – प्र.जि.मा.- ५९- पर्यंत रस्‍ता एकुण ३७ कि. मी., १७) रा. मा. २४८ ते रामवाडी – कोष्‍टगाव – लहानेवाडी- सारोळा – कारेपूर- रा. मा. २४८ पर्यंत रस्‍ता एकुण २४ कि. मी., १८) रा. म. मा.- ७५२ के – शिवणी खु. ते सेलू बु.- बाभळगाव- कातपूर – प्र.जि.मा.- ५१ पर्यंत रस्‍ता एकुण १८ कि. मी. याप्रमाणे एकुण ४४२ किलोमीटर रस्‍त्‍यांना भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून राज्‍य शासनाने जिल्‍हा मार्ग असा दर्जा दिला आहे.
जिल्‍हा परिषदेअंतर्गत सदरील रस्‍ते असल्‍यामुळे या रस्‍त्‍यांना अपेक्षीत निधी उपलब्‍ध होत नव्‍हता. वर्षानुवर्षे अनेक रस्‍त्‍यांची मोठी दुरावस्‍था कायम होती. या दुरावस्‍थेमुळे रस्‍त्‍यावरून ये-जा करणाऱ्या नागरीकांना त्‍याचबरोबर वाहनधानकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्‍याने लातूर ग्रामीण भाजपाचे नेते तथा जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी रस्‍त्‍याची गैरसोय लक्षात घेवून शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला. सदर रस्‍त्‍यावरील गावाची संख्‍या, लोकसंख्‍या, रस्‍त्‍यांचा होणारा वापर विचारात घेवून आणि ग्रामीण भागातील जनतेची अडचण लक्षात घेवून १६ डिसेंबर २०२२ रोजीच्‍या शासन निर्णय पत्रकाद्वारे शासनाने सदरील ४४२ कि.मी. रस्‍त्‍यांना जिल्‍हा मार्ग म्‍हणून दर्जा दिला आहे.
लातूर ग्रामीण मतदार संघातील जिल्‍हा मार्ग असा दर्जा प्राप्‍त झालेल्‍या ४४२ कि. मी. रस्‍त्‍याला येत्‍या काळात राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्‍या माध्‍यमातून शासनाच्‍या विविध योजनेतून निधी उपलब्‍ध करून रस्‍त्‍यांच्‍या कामांना गती देवू, असे भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी बोलून दाखविले. सदरील ४४२ कि.मी. रस्‍त्‍यांना जिल्‍हा मार्ग असा दर्जा प्राप्‍त करून घेतल्‍याबद्दल अनेक गावातील भाजपाच्‍या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांनी आ. रमेशअप्‍पा कराड यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

About The Author

error: Content is protected !!