उदयगिरी महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम चे 24 डिसेंबरला उद्घाटन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम चा उद्घाटन समारंभ दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता मल्लिकार्जुन मानकरी, अध्यक्ष महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आ. संजयजी बनसोडे,यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर परिसरातील सर्व खेळाडू त्यांचे पालक आणि सर्व क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अॅड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया आणि अॅड.सूर्यकांत पाटील, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, क्रीडा संचालक प्रा.सतीश मुंढे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.
