शेकापूरात जनशक्ती ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय,सरपंचपदी उर्मिला शेळगे:9 पैकी 8जागावर वर्चस्व
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील एक अत्यंत महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी शेकापूर ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच शरदराव देशमुख,विद्यमान चेअरमन बाळासाहेब नवाडे,माजी चेअरमन सुधाकर सावंत शिवसेनेचे जिल्हाउपाध्यक्ष अंकुश कोनाळे यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती ग्राम विकास पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार उर्मिला विठ्ठल शेळगे विजयी झाल्या आहेत. शिवाय ९ पैकी ८जागा ताब्यात घेत ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विरोधकांना एका जागेवर समाधान मानावे लागले.
जनशक्ती ग्राम विकास पॅनल विजयी झाल्याबद्दल माजी गृहराज्यमंत्री तथा आ. संजयभाऊ बनसोडे ,महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक तथा स्व.रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे, विधानपरिषदेच्या उपसभापदी निलमताई गो-हे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी,शिवसेना तालुकाप्रमुख कैलास पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.
निवडून आलेल्या जनशक्ती ग्राम विकास पॅनल सदस्यांची नावे-संदीप व्यंकटराव हालकरे,मनोहर विश्वनाथ शिंदे,सविता शिवाजी सावंत,अंकुश रामराव कोनाळे,अंजली सतीश घुगे,आशा बाळासाहेब नवाडे,अविनाश लहु शेल्हाळे,केवळबाई अंगद हणमंते.
जनशक्ती ग्राम विकास पॅनलच्या विजयासाठी निवृत्ती सावंत, ज्ञानोबा सावंत, बालाजी बिरादार,संतोष पाटील, राजासाहेब नवाडे,आदित्य देशमुख,मधुकर सावंत, रामचंद्र सावंत, राम हलकरे,हरी सावंत, संदीप सावंत, केशव सावंत, आनंद भागाये, दत्ता सावंत, श्रीमंत शेल्हाळे, हणमंत शेल्हाळे, प्रसाद हलकरे, मारुती हलकरे, पुंडलिक हलकरे, माधव शेल्हाळे, नवनाथ शिंदे, माधव गायकवाड, सुभाष बोरगावे, मनोज शिंदे, बालाजी काळगापुरे, विकास काळगापुरे, दीपक शिंदे, मारुती जांबवाले, रामदास कांबळे, माधव कांबळे,अजय कांबळे, अंकुश गुट्टे, विठ्ठल फड, संजय फड, शिवराज बिरादार, नवनाथ कलमे, धोंडीराम कलमे, अनिल फड, तुकाराम फप्पागीरे आदींनी मोलाची कामगीरी केली.
