वाढवण्यात वेळा अमावस्या शेतकऱ्यांनी उत्साहात साजरी केली.

वाढवण्यात वेळा अमावस्या शेतकऱ्यांनी उत्साहात साजरी केली.

वाढवणा (बु.) (हुकूमत शेख) : वेळा अमावस्या सण शेतकरी आपल्या काळी आईची पुजा करून सर्व परिवार इष्ट मित्रांना शेतात येउन जेवण व झोका खेळ, पतंग उडविण्याचा आंनद घेण्यासाठी बाहेर गावी शहराच्या ठिकाणी कुठे ही असणारे परिवारातील सदस्य इष्ट मित्राना शेतकरी बांधव आठ पंधरा दिवस अगोदरच अमावस्याची माहिती देतात. वेळा अमावस्याला येण्या करिता आग्रहाचे आमंत्रण देऊन बोलावतात, मानराखीत आनंद लुटण्याकरिता सर्व कारभार, काम सोडुन कामगार, मजूरदार, व्यापारी, गुत्तेदार, मित्र,नौकरीवाले ज्या ठिकाणी असतील त्या कामावरून सुट्टी घेत, रजा घेउन शहरातून गावाकडे वेळा अमावस्या सणासाठी आवर्जून हाजरी लावून झोका, पतंग उडविणे, व भोजनात अनेक प्रकारचे व्यंजन व आंबील चा अस्वाद घेत मस्त गुंगीत, मस्त मजेत सर्व कामाचा ताण रोजची किट किट धावपळ सर्व काम सोडुन एक दिवस शेतात मौज मस्ती करत कमीत कमी वर्षाचा एक दिवस तणाव मुक्त राहून सर्व इष्ट मित्रांची भेट घेत झोका,पतंग उडवून खेळाचा आनंद घेत, जुन्या आठवणी काढत आपल्या इष्ट मित्र परिवारा सोबत वेळा अमावसेचा आनंद शेतात घेत, सर्व वाढवणा येथील व परिसरातील शेतकरी बांधवानी वेळा अमावस्या उत्साहात साजरी केली.
वेळा अमावस्येला अनन्य साधारण महत्व असुन सधन शेतकरी ज्ञानेश्वर पुंड व सोबत चिरिंजीव ह. भ. प. गोपाळ महाराज पुंड पाटील यांच्या शेतात परिवार तसेच मित्र व कामगार व्यापारी यांना अमावस्या निमित्त सर्वांना शेतात पंक्तीत बसुन सर्व जण जेवण, अंबिल, भात, वरण बाजरीची भाकर, बाजरीचे लाडू चा अस्वादाचा आनंद घेताना दिसत होते. अशाच प्रकारे सर्व शेतकरी बांधवानी आपापल्या जवळील इष्ट मित्र शेजारच्या आवडत्या जिवाभावाच्या नात्यातील लोकांना आमंत्रीत करून सर्वा सोबत आपापल्या शेतात वेळा अमावस्याचा आनंद घेताना दिसत होते. शेतात चोहीकडे छोटया झोपड्या व महिला, पुरुष, लहान तरुण मुले मुली आनंदी आनंद झोका खेळत पतंग उडवत दिसत होते.

About The Author

error: Content is protected !!