नगरसेवक अहमद खाँसाब यांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : लातुर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कँग्रेस पक्षाचे सलग १५ वर्ष नगरसेवक राहिलेले अहमद खाँसाब हे उदगीर येथे एक कार्यक्रमाला आले होते. तेंव्हा मुजीबभाई हाशमी मित्र मंडळाच्या कार्यालयास त्यांनी भेट दिली तेंव्हा त्यांचा सत्कार करण्यात आले.
उदगीर येथील औरंगपूरा येथे सामाजिक कार्यक्रमासाठी अहमद खाँसाब आले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मुजीबभाई हाशमी मित्र मंडळाच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी मुजीबभाई हाशमी यांनी अहमद खाँसाब व नुकतेच उमरा येथे जावून आलेले त्यांचे बंधू मोहम्मद खाँसाब यांचा सत्कार केला. अहमद खाँसाब यांनी मुजीबभाई हाशमी मित्र मंडळाच्या कामाची माहिती घेतली व मित्र मंडळाच्या कामाचे कौतुक केले. यावेळी मित्रमंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
