हवसे, गवसे व नवसेंसह १० लाखांच्या वर आलेल्या भाविक यात्रेकरूंसह माळेगावच्या खंडोबा यात्रेचा उत्साहाने प्रारंभ

हवसे, गवसे व नवसेंसह १० लाखांच्या वर आलेल्या भाविक यात्रेकरूंसह माळेगावच्या खंडोबा यात्रेचा उत्साहाने प्रारंभ

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
——————————–
   ऑन दि स्पॉट रिपोर्ट

*लोहा,
       दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या व खंडोबाचे पवित्र स्थान म्हणून गणल्या गेलेल्या लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रेस २२डिसेंबर पासून हजारो वारूंच्या, असलेल्या भाविक भक्तांच्या, हवसे गवसे व नवसेंह, भारतातील विविध प्रांतातून आलेले व्यापारी, खरेदीदार अशा १०लाखांच्या वर असलेल्यांच्या उपस्थितीत देवस्वारीने मोठ्या उत्साहाने यात्रेस प्रारंभ झाला आहे.
     दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या श्री खंडोबा यात्रेला जवळपास ३०० वर्षाच्या वरची परंपरा आहे. माळेगावपासून १५त२० कि. मी. अंतरावर असलेल्या वीर नागोजी नाईक यांच्या कुटुंबीयांचा परंपरागत मान असून या कुटुंबातील गणपतराव मल्हारराव नाईक हे नाईक वय ८०वर्ष असलेले नाईक कुटुंबाच्या १०व्या पिढीचे वारसदार व पालखीचे मानकरी आहेत. देवस्वारीच्या पालखीचा मान नागोजी नाईक यांच्या या  कुटुंबाचा आहे. माळेगावस्थित वीर नागोजी नाईक यांचा अर्ध पुतळा सुग्यामुग्याचे कैवारी, गुराखी साहित्य संमेलनाचे जनक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार व माजी खासदार, शिक्षणमहर्षी भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी २०ते २५वर्षापूर्वी कृतज्ञतापूर्वक साकारला आहे.
    माळेगावची ही यात्रा दक्षिण भारतात व्यापार उदिमासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा कर्नाटक आदि प्रांतातून व्यापारी आपले अश्व,उंट,घोडे वा इतर जो त्यांचा व्यवसाय आहे ते घेऊन येतात.पूर्वी महिना महिना चालणारी यात्रा आता केवळू१०ते १२दिवस चालते आहे. या दरम्यान कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होते. या यात्रेत मिळत नाही अशी एकही वस्तू वा पदार्थ नसतो.
   यात्रेत ५ते६ लोकनाट्य मंडळ, ६ते७ सर्कस तंबू,५ते६ आकाशी पाळणे तसेच उंट,घोडे, गाढव विक्रेते, त्यांचे साहित्य विक्रेते, विविध कौटुंबिक साहित्य विक्रेते, आराधी, गोंधळी, भांडी, घोंगडी, कोंबडी, बांबू, लाकडाचे व्यापारी, कपडे विक्रेते, कुत्रे, व्हलेर, तित्तर विकणारे, भटके, बहुजन कष्टकरी, शेतकरी, मजुरदार, आदिसह विविध पशुप्रदर्शन, कृषिप्रदर्शनाचे१२०, समाजकल्याणचे शिक्षण, वनिकरण महिला बालकल्याण डी. आर. डी. चे प्रदर्शने ४०च्या वर जनजागृती प्रदशने सेवा निवृत्त आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक विश्वंभथराव काकडे गुरूजींचे शैक्षणिक बौद्धिक प्रदर्शन, शाकाहारी, मांसाहारी ६००च्या वर हॉटेल्स, छोटे छोटे ५०००च्या वर दुकानदार आहेत.
     माळेगावच्या या यात्रेत हजारो नव्हे तर १० लाखांच्या वर असलेल्या भाविक भक्तांसह हवसे, गवसे, व नवसेंचा सहभाग आहे.

About The Author

error: Content is protected !!