कै. रसिका महाविद्यालयाच्या राज सुरवसे खेळाडूची विद्यापीठाच्या योगा संघात निवड

कै. रसिका महाविद्यालयाच्या राज सुरवसे खेळाडूची विद्यापीठाच्या योगा संघात निवड

देवणी (एल.पी.उगीले) : देवणी येथील कै. रसिका महाविद्यालयाचा खेळाडू राज सुरवसे (बीएससी द्वितीय वर्ष ) याची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या योगा संघात निवड झाली आहे. हा खेळाडू या दिनांक 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2022 कालावधीत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ योगा स्पर्धा कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर (ओडीसा) येथे आयोजित होणाऱ्या स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.यास प्रा. डॉ. सचिन चामले (शारीरिक शिक्षण संचालक) यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राज सुरवसे याची विद्यापीठात विद्यापीठाच्या योगा संघात निवड झाल्याबद्दल संस्था अध्यक्ष गोविंदरावजी भोपणीकर, संस्था सचिव गजाननजी भोपणीकर , प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे ,उप-प्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

error: Content is protected !!