अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात साने गुरुजी यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने साने गुरुजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ परीक्षे मध्ये बी.ए. कला शाखेत सर्वप्रथम आलेली महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थी कु. समीक्षा शेषराव कांबळे यांच्यासह पालक शेषराव कांबळे, यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विभागाचे डॉ. बालाजी कारामुंगीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठातून सर्वप्रथम आल्याबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी कु. समीक्षा कांबळे व तिचे पालक शेषराव कांबळे यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले. तर, आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. अतिश आकडे, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
