माधवी चौकटे यांना ‘महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड फॉर सोशल वर्क’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाची माजी आदर्श विद्यार्थिनी माधवी रामेश्वर कानघुले (चौकटे) यांना नुकताच ‘महात्मा गांधी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, नवी मुंबई’ यांच्यातर्फे दिला जाणारा महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड फॉर सोशल वर्क २०२१ नुकताच जाहीर झाला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी व यशस्वी संस्था चालक सौ. माधवी रामेश्वर कानघुले (चौकटे) यांना सामाजिक कार्याबद्दल महात्मा गांधी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी नवी मुंबईच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘महात्मा गांधी नॅशनल अवॉर्ड फॉर सोशल वर्क २०२१’ हा पुरस्कार जाहीर झाला. याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे श्रीरंगराव पाटील एकंबेकर, ज्ञानदेव झोडगे तसेच मंडळाचे सर्व सन्मानिय मान्यवर व महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह महाविद्यार्थी सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व आजी- माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
