अहमदपूर चाकूर मतदारसंघातील सर्वच ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार : आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर चाकूर मतदारसंघातील सर्वच ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार : आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर – चाकूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ता. येथील इंद्रायणी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. नागठाणा, हाळी (खुर्द), नागदरवाडी, मांडणी, जठाळा – दळवेवाडी, टाकळगाव (का), चोबळी – मोरेवाडी, नायगाव, हिंपळनेर, सुगाव, शिरूर ताजबंद, वळसंगी, नायगाव, गांजूरवाडी, शिवनखेड खुर्द – गादगेवाडी, धसवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंचांचा, सदस्यांचा तसेच प्रचार पॅनल प्रमुखांचे आ.बाबासाहेब पाटील यांनी अभिनंदन करत त्यांचा सन्मान केला.

“अहमदपूर – चाकूर मतदारसंघात विकासकामांसाठी माझे सर्व नवनिर्वाचित सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांना नक्कीच पाठबळ असणार आहे. गावची एकता अबाधित ठेवत सर्वांगीण विकास साधण्यावर भर द्यावा. मतदारसंघातील सर्वच ग्रामपंचायतींना गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे असे मत आ. बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी सभापती करीमसाहेब गुळवे, माजी सभापती शिवानंदतात्या हेंगणे, तुकाराम पाटील, जिल्हा परिषद गटनेते मंचकराव पाटील, सुभाषराव पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, मिलिंदराव महालिंगे, प्रशांत भोसले, शहराध्यक्ष अजहर बागवान, शिवदर्शन स्वामी, इलियास सय्यद तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!