शास्त्री शाळेत वीर बाल दिवस साजरा

शास्त्री शाळेत वीर बाल दिवस साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात वीर बाल दिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख पाहुणे म्हणून बाळाराम बानापुरे व विभाग प्रमुख सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होत्या.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बाळाराम बानापुरे यांनी बाल वीर जोरावीर सिंग व फतेह सिंग यांनी वयाच्या ९ व्या व ६व्या वर्षी आपल्या धर्माच्या आस्थेसाठी मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिला.मोगलांनी त्यांचा शिरच्छेद करून भिंतीमध्ये गाढले.एवढ्या लहान वयात तशी मुलांना कमीच समज असते.आपल्या धर्माच्या शिकवणीमुळे त्यांनी ठामपणे नकार दिला.केवढे हे त्यांचे धाडस.त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन राष्ट्ररक्षणार्थ सदैव तत्पर असले पाहिजे.छोट्या छोट्या कामातून तुम्हीही देशसेवा करु शकता.आपल्या धर्माची शिकवण सर्वांनी लक्षात ठेऊन त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे.असे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी आजच्या दिवशी संपूर्ण भारत देशात वीर बाल दिवस साजरा केला जात आहे.विविध उपक्रम राबविले जात आहेत.सर्व विद्यार्थ्यांनी वीर बालकांच्या साहस कथा वाचाव्या,धर्मविरोधी, देशविघातक कृत्ये आपल्या अवतीभवती घडत नाहीत ना याबाबत दक्ष रहावे.असे सांगितले.

सुत्रसंचलन सौ.सुनिता कांबळे यांनी केले तर, आभार सौ.सोनिया देशपांडे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!