मुस्लिम आरक्षण साठी उदगीरात आंदोलन

मुस्लिम आरक्षण साठी उदगीरात आंदोलन

उदगीर (एल.पी.उगीले) : मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाज सामाजीक ,राजकीय,आर्थिक शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात मागासलेला असल्याचे शासकीय समित्या रंगनाथ कमीशन,सच्चर कमीशन, डॉ.महेमदुर्रहमान कमीशन यांच्या अहवालाने स्पष्ट होत आहे. संपूर्ण राज्यात मुस्लिम आरक्षण, शिक्षण,संरक्षणाची मागणी समाज करीत आहे,लोकशाही पद्धतीने वेळोवेळी आंदोलन करुण आपली भूमिका या समाजाने शासन दरबारी व्यक्त केली आहे.मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याचे  उच्च न्यायालयाने आदेशित करुण देखील या बाबत शासन गंभीर नाही.म्हणून मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मुस्लिम आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी शासनाचे राज्य हिवाळी अधिवेशन सुरु आहे.

या अनुषंगाने राज्यभरात मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी निदर्शने आंदोलन करण्यात आले. याची दखल राज्य शासनाने गंभीरपने घ्यावी, अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्यात येईल.असे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

या वेळी निवेदन देताना मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे शेख इरफान,शेख समीर, पठाण मुसा, शेख मुंतजीब,पठान खाजा खिजर मुन्शी,अजमार शेख,शेख मोहियॉद्दीन, सम्यद वाजीद,सयद असलम,मिर्जा अफान,शेख़ अल्ताफ़ हुसैन, रामजी संभा,बासाहेब सुर्यवंशी,शेख ईब्राहिम, शमशुद्दीन जरगर,अहमद सरवर,नाईक सुधावार,शेख अशफाक,बस्वेश्वर डावळे सह राजकीय पक्षांचे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!