वाढवणा व परिसरात बंदी असलेली कॅरी बॅग दुकानातुन सर्रास वापर
वाढवणा बु (हुकूमत शेख) : वाढवणा व परिसरात कोणत्याही दुकानातुन जीवनावश्यक वस्तु घेतल्यास सर्रास दुकानदार बंदी असलेली कॅरी बॅग मध्ये वस्तु घालुन ग्राहकांना दिली जात असुन देखील दिवसा ढवळ्या कायदा पायदळी तुडवला जात असुन देखील स्थानिक प्रशासन व संबंधित तालुका, जिल्हा प्रशासन देखील बघ्याची भूमिका घेत मुग गिळूण गप्प का ? असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे. भाजी पाला असो की किराणा वस्तू असो, सर्रास वाढवणा येथील बाजारात व बाजार पेठ किराणा दुकानातून ग्राहकांना कॅरी बॅग दिली जात आहे. बंदी असलेली कॅरी बॅग आणतो कोण? विक्री करतो कोण? याची शहनिशा करून प्रतिबंध असलेली कॅरी बॅग सर्रास ठोक व किरकोळ व सामान्य ग्राहकांच्या हातात वस्तु घालुन दिली जात असुन संबंधित प्रशासनाने कॅरीबॅगचा खुलेआम वापर होत असलेल्या दुकानावर योग्य चौकशी करून ठोक व किरकोळ विक्री करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
