रेणापूर शहरासह विविध पदाधिकाऱ्यांना आ. कराड यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप

रेणापूर शहरासह विविध पदाधिकाऱ्यांना आ. कराड यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या रेणापूर शहर पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअ‍प्पा कराड यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे रविवारी वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश आंबेकर, भागवत सोट, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदे, माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, प्रदेश महिला आघाडीच्या मिनाक्षी पाटील, ललिता कांबळे, शिला आचार्य, तालुकाध्यक्ष अनुसया फड, महेंद्र गोडबोले, श्रीकृष्ण पवार, महेश गाडे, श्रीकृष्ण मोटेगावकर, रेणापूर शहराध्यक्ष दत्ता सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष उत्तम चव्हाण, तालुका भाजयुमो उपाध्यक्ष अमोल गायकवाड, जेजुरी कांबळे, भाजपा रेणापूर शहर सरचिटणीस अच्युत कातळे, हनुमंत भालेराव, प्रदीप चव्हाण, मारूफ आतार, रमेश वरवटे, संतोष राठोड, उपाध्यक्ष चंद्रकांत आलापुरे, सचिन शिरसकर, चिटणीस शेख अजीम, नंदकुमार बंडे, हनुमंत भालेराव, कार्यालय प्रमुख जगन्नाथ कातळे, कार्यकारणी सदस्य उज्वल कांबळे, अंतराम चव्हाण, काशिनाथ गाडे, बालाजी ईस्ताळकर, सूर्यकांत कुडके, प्रकाश चक्रे, मनोज चक्रे, दत्ता व्यवहारे, रंजीत काळे, महिला आघाडी शहराध्यक्ष छायाताई जोगदंड, उपाध्यक्ष संगीता सातपुते, भटक्या विमुक्त आघाडी शहराध्यक्ष गोविंद राजे, दलित आघाडी लखन आवळे, अल्पसंख्यांक आघाडी शहराध्यक्ष रफिक शिकलकर.

रेणापूर तालुका महिला आघाडीच्या सरचिटणीस संजिवनी नवगिरे, राधा लहाडे, उपाध्यक्षा उमा सूर्यवंशी, रेखा आकनगिरे, चिटणीस लता घुगे आणि रेणापूर तालुका विद्यार्थी आघाडी सरचिटणीस अमर कदम, विशाल राठोड, दीपक काळे, उपाध्यक्ष राहुल कापसे, ऋषिकेश गडेराव, गोविंद कांबळे, पवन राठोड, चिटणीस शंकर काळे, आदित्य कदम, बालाजी शिंदे, समी जोगदंड, अमित कापसे इत्यादी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे आणि जगातील लोकप्रिय नेते नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात आपण करणारे कार्यकर्ते आहोत याचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे असे सांगून आ. रमेशअप्पा कराड यांनी प्रत्येक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी त्याचबरोबर जिद्दीने जोमाने आणि प्रामाणिकपणे काम करून भाजपाला प्रत्येक निवडणुकीत विजयश्री मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

About The Author

error: Content is protected !!