‘हिम्मत’…’बादल’.. ‘माधुरी’ अन् ‘राणी’च्या लोभस पणाने’ … माळेगावच्या अश्वांची वाढला ‘मान’…!’

'हिम्मत'…'बादल'.. 'माधुरी' अन् 'राणी'च्या लोभस पणाने' … माळेगावच्या अश्वांची वाढला 'मान'…!'

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

यात्रेतील लक्षवेधी अश्व

लोहा,
माळेगावच्या यात्रेत … सहकारमहर्षी कै. रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांचे नातू व भगवानराव पाटील यांचे चिरंजीव शहाजी भैया यांचा ‘हिम्मत’ मोठ्या ‘हिमती’ने… ऐटबाज रूपात… ‘माजी राज्यमंत्री ना. धनंजय मुंडे यांचा ‘बादल’… हा घोड्याने तर विधान परिषदेचे आ. रमेश अप्पा कराड यांची’ माधुरी’ … अन् लोह्याचं मोठ्ठं प्रस्थ असलेल्या भगवानराव क्षीरसागर यांच्या चिरंजीवांच्या म्हणजेच डॉ. मंगेश क्षीरसागर यांची’राणी’च्या लोभस पणाने … लाखो यात्रेकरूंच्या साक्षीने… भलताच ‘भाव’ खात… अन् … ‘भाव’ पेलत … दिमाखाने उभे होते.
घोड्याच्या विक्रीसाठी… खरेदीसाठी… तसेच माळेगावात राहुटी टाकून… आपल्या लाडक्या घोड्याला … तिथं आणून… दिमाखात उभे करून…तमाम यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेत… त्यांच्यात यात्रेची गोडी निर्माण करण्यात… या अश्वांचा… अश्विनींचा… सिंहाचा वाटा राहत आला आहे…!
डिसेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या या यात्रेत… पंडीत अण्णा मुंडे यांच्या पासून सुरू असलेल्या परंपरे नुसार… सालाबादा प्रमाणे याही वर्षी… राज्याचे माजी राज्यमंत्री ना.धनंजय मुंढे यांचा ६वर्षीय… ‘बादल ‘दाखल झाला /आहे… तो यात्रेकरूंचे आपले लक्ष वेधून घेत आहे… त्याच्या डोळ्यात एक वेगळेच तेज आहे… प्रेमळपणा आहे… आपलं निर्मळ… निखळ… आणि निर्व्याज भावना तो बादली बादलीने आपण जसं पाणी टाकावं… त्याप्रमाणे तो यात्रेकरूंना देतोय…!
तसेच विधान परिषदेचे आ. रमेश अप्पा कराड यांनी माळेगावात आपली दरवर्षी घोडी घेऊन येण्याची परंपरा जपत आहेत… आपले आजोबा दादाराव कराड…. यांच्या पासून … ते त्यांचे पुत्र वि. दा. कराड…. यांच्या पर्यंत…. व आता… वि. दा. कराड यांचे चिरंजीव….म्हणेजे दादाराव कराड यांचे नातू रमेश अप्पा कराड… दर वर्षी माळेगावत येऊन… त्यांची परंपरा पुढे चालवत आहेत… त्या़ची राहुटी म्हणजे एक राजमहालच आहे… येथे येणाऱ्या प्रत्येकाला…अत्यंत प्रेमळपणे… आत्मीयतेने… आपुलकीचे अतिथ्य केले जाते… एवढेच नाही तर … शुद्ध शाकाहारी जेवण करून जाण्याचा आग्रह केला जातो…. अनेक जण जेवत आहेत … त्यासाठीचा सगळा सरंजाम त्यांना तेथे उपलब्ध करून दिला आहे… एवढी प्रचंड प्रमाणात सोय लोखोंच्या जनसमुदायाला रमेश अप्पा कराड यांनी उपलब्ध करून ठेवली आहे… जे सहजासहजी कोणालाही करता येत नाही… तसेच त्यांचे… येथील संयोजक हणमंत घुले यांचा आग्रह प्रचंड विनयशील आहे…!
यांची ७वर्षीय ‘माधुरी’ ही सुद्धा त्यांच्या स्वभाव गुणाला साजेशीच आहे… रूबाबदार… तेजस्वी… गुटगुटीत… असून तिला पाहण्यासाठी येणा-यांना सर्वांना ती… ‘माधुर्या’ नेच पाहतेय…!
यात्रेतील तिसरी आकर्षण बनलेली घोडी… अश्विनी म्हणजे… लोह्यातील एक मोठ्ठं प्रस्थ असलेले… पण तेवढेच अत्यंत ऋजू अंत:करणाचे… मृदू… नम्र स्वभावाचे… भगवानराव क्षीरसागर आडगावकर… यांचे चिरंजीव डॉ. मंगेश क्षीरसागर यांची देखणी ५ वर्ष ६ महिन्यांची… ‘राणी’ … अगदी एखाद्या ‘महाराणी’च्या तो-यात भव्य राहुटीत उभी असून… सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे… ती भाव खाऊन जात होती…. घोडीत घोडी आडगावकरांची घोडी… गोड… असलेली ‘राणी’… अशा यात्रेकरूंच्या प्रतिक्रिया उमटत होत्या…! भगवानराव क्षीरसागर यांची गत ४०वर्षांपासून सुरू केलेली ही घोड्याची परंपरा… आता डॉ. मंगेश क्षीरसागरसह … त्यांचे भाऊ… अभियंता संतोष क्षीरसागर… आणि त्यांचा मुलगा कैवल्ये क्षीरसागर यांच्या पर्यंत म्हणजे तिसऱ्या पिढीपर्यंत अगदी भगवानराव क्षीरसागर या़च्या अंत:करणात सुरूवातीला जशी होती तशीच आजही आहे..!

‘हिम्मत ए मर्दा… तो ‘मदद’ दे खुदा…!’
यात्रेत…. लातूर जिल्ह्यातील उदगीरचे ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते सहकार महर्षी कै. रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांचे चिरंजीव भगवानराव पाटील यांच्या राहुटीतील….’३ वर्ष ६महिन्यांच्या ‘हिम्मत’ या पंजाबी नुकरा जातीच्या ‘अश्वाने’ अनेकांचे डोळे आकर्षित करून भुवया उंचावल्या… मनात कायमचे घर केले… विशेष म्हणजे हा घोड्याने तृतीय क्रमांक पटकावून १० हजाराचे बक्षीस ही त्याला प्राप्त झाले आहे… यात्रेत असून हंसराज पाटील बोरगावकर उपाख्य जेडू पाटील यांचा ‘कृष्ण’ हा घोडा कृष्णा सारखाच नटखट रूपात दिमाखाने उभा आहे…!
या शिवाय अनेक मान्यवरांनी आपल्या लाडक्या ‘घोड्यांना’ घेऊन माळेगाव यात्रेत हजेरी लावली आहे.

About The Author